साऊथ चित्रपटांच्या सुपरस्टार्सना त्यांच्या पडद्यावरील नावावरून सर्वजण ओळखतात पण त्यांची खरी नावे काय आहेत हे जाणून घेऊया!
सुपरस्टार महेश बाबू यांचे खरे नाव घट्टामनेनी महेश बाबू आहे. त्यांनी सरकारू वारी पाटा, महर्षी, पोकरी, स्पायडर, बिझनेसमन यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
कमल हसनचे खरे नाव पार्थसारथी श्रीनिवासन आहे. त्यांनी विक्रम, इंडियन 2, दशावतार, कल्की 2898 एडी, ठग्स लाइफ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. त्यांनी वाथी, रायन, कॅप्टन मिलर, रांझना, मारी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रभासचे खरे नाव खूप मोठे आहे आणि त्यात २० अक्षरे आहेत. त्यांचे खरे नाव उप्पलपती व्यंकट सुर्यनारायन प्रभास राजू आहे. त्याने बाहुबली, सालार, साहो या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
KGF स्टार यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्यांनी मोदालासाला, ड्रामा, गुगली, मिस्टर अँड मिसेस रामाचारी, मास्टरपीस यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांनी रोबोट, चंद्रमुखी, जेलर, लाल सलाम यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
साऊथचा मेगास्टार चिरंजीवीचे खरे नाव कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद आहे. त्यांनी आचार्य, इंद्र, वॉलटेर वीरैया, भोला शंकर यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
साऊथ स्टार पवन कल्याणचे खरे नाव कोनिडेला कल्याण बाबू आहे. भीमला नायक, गब्बर सिंग, शिवम, कुशी, वकील साहब यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
सुपरस्टार सूर्याचे खरे नाव सरवणन शिवकुमार आहे. त्याने सोरारई पोटरू, गजनी, सिंघम, नंदा, कांगुवा या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्याने मास्टर, सरकार, मर्सल, थेरी आणि बिगिल सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.