२०२४ मध्ये असे अनेक चित्रपट आले ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा २ : द रूल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर हा चित्रपट १५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे
प्रभास-दीपिका पदुकोणच्या ‘कल्कि २८९८ एडी’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटाने १०५० कोटींची कमाई केली होती.
श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ ने प्रेक्षकांची मने जिंकली. २०२४ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने ८७४.५८ कोटींचा व्यवसाय केला.
कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘भूल भुलैया ३’ने देखील त्याच्या रिलीजने खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने ४१७.५१ कोटींचा व्यवसाय केला.
अजय देवगण-रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर चित्रपट ‘सिंघम अगेन’ ॲक्शन-थ्रिलरने भरलेला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने ३८९.६४ कोटींची कमाई केली.
‘फायटर’ या ॲक्शन पॅक्ड थ्रिलर चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धमाका केला. हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या या चित्रपटाने ३४४.४६ कोटींची कमाई केली
अजय देवगण-आर माधवनचा जबरदस्त हॉरर चित्रपट ‘शैतानने’ही प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटाने २११.०६ कोटींची कमाई केली.
शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा ‘मुंज्या’ हाही एक हॉरर आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने १३२.१३ कोटींचा व्यवसाय केला.