२०२४ मध्ये सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रीने पैसे कमावले ते आपण जाणून घेऊयात. या वर्षात चित्रपटातून अनेक अभिनेत्रींनी चांगले पैसे कमावले.
२०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर आलेल्या सैतान या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटात काम केलेल्या ज्योतीका यांना त्याबदल्यात चांगली रक्कम मिळाली होती.
हनुमान नावाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत कमाई केली होती. या चित्रपटाने २०० कोटींच्या पुढं कमाई केली होती. या चित्रपटातील अमृता अय्यर ही अभिनेत्री नवव्या क्रमांकावर आहे.
सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या यादीत साई पल्लवी ही अभिनेत्री नवव्या क्रमांकावर आहे. तिचा अमरण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
करीना कपूरने अभिनय केलेल्या सिंघम अगेन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३७८ कोटींचा व्यवसाय पूर्ण केला. या यादीत करीना सातव्या क्रमांकावर आहे.
सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तृप्ती डिमरी ही सहाव्या क्रमांकावर आहे. तिने काम केलेल्या भूल भुलैय्या ३ चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
जान्हवी कपूरने काम केलेल्या देवरा या चित्रपटाने चांगली कमाई केली. सर्वात जास्त कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ती पाचव्या क्रमांकावर आहे.
मीनाक्षी चौधरी या अभिनेत्रींचे इंडस्ट्रीमध्ये तिच्या चांगल्या कामामुळे नाव झालं आहे. ती सर्वात जास्त कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
श्रद्धा कपूरचा यावर्षी आलेला स्त्री २ हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर गाजला. त्यानंतर ती सर्वात जास्त पैसे कमावलेल्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दीपिका पादुकोण तिच्या स्टाईल आणि अभिनयामुळे कायमच चर्चेत येत असते. ती सर्वात जास्त कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पुष्पा २ चित्रपटातील रश्मीका मनधना ही अभिनेत्री सर्वात जास्त कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. ती तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत येत असते.