सर्वात महागड्या हीरोचा स्ट्रगल माहितीये? या अभिनेत्याला सुरुवातीला कमी मानधन असणाऱ्या भूमिका कराव्या लागल्या. पण सलग 25 हिट सिनेमे दिल्यानंतर अखेर तो सुपरस्टार झाला.
दाक्षिणात्य सिनेमांमधील प्रसिद्ध कुटुंबामध्ये थलापति विजयचा जन्म झाला आहे. पण त्याने स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
Image credits: instagram
Marathi
मानधन म्हणून मिळायचे केवळ 500 रुपये
बालकलाकार म्हणून थलापति विजयने सिनेमांमध्ये काम केले आहे. यावेळेस त्याला मानधन म्हणून केवळ 500 रुपये मिळाले होते. पण तो आपले काम प्रामाणिकपणे करत असे.
Image credits: instagram
Marathi
करिअरची सुरुवात
80च्या दशकात बालकलाकार म्हणून विजयनं आपल्या करिअरची सुरुवात केली. विजय हा निर्माते एस.ए.चंद्रशेखर यांचा मुलगा आहे. 1984 रिलीज झालेला 'वेट्री' हा त्याचा पहिला सिनेमा.
Image credits: instagram
Marathi
मिळाला मोठा ब्रेक
90च्या दशकात विजयला सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
Image credits: instagram
Marathi
वयाच्या तिशीपूर्वी त्यानं दिले 25 हिट सिनेमे
खूप कमी लोकांना हे माहिती आहे की या अभिनेत्याने वयाची तिशी पूर्ण करण्यापूर्वीच इंडस्ट्रीला तब्बल 25 हिट सिनेमे दिले. हा रेकॉर्ड अजूनही विजयच्याच नावे नोंद आहे.
Image credits: instagram
Marathi
तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार
तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून विजय ओळखला जातो. त्याचे सिनेमे हिंदी भाषेसह अन्य भाषांमध्येही डब होऊन रिलीज होतात.
Image credits: instagram
Marathi
सुपरस्टारचे स्टारडम
90च्या दशकात थलापति विजयने जबरदस्त स्टारडम मिळवलं. वर्ष 2010 दरम्यान त्याने सुपरस्टार रजनीकांत व कमल हासन यांनाही स्पर्धेत मागे टाकल्याचे म्हटलं जाते.
Image credits: instagram
Marathi
'लियो'साठी घेतले तगडे मानध
मिळालेल्या माहितीनुसार, विजयने लोकेश कनगराज दिग्दर्शित 'लियो' (Leo Movie) सिनेमासाठी तब्बल 120 कोटी रुपये इतके मानधन घेतल्याचे बोलले जात आहे.