Marathi

ENTERTAINMENT NEWS

यंदा कर्तव्य आहे!सुपरस्टार प्रभास अडकणार विवाहबंधनात?

Marathi

साऊथ सुपरस्टार प्रभास करतोय लग्न?

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभासशी संबंधित धमाकेदार बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार प्रभास लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटलं जात आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रभासच्या काकीने दिली माहिती

बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या काकीने त्याच्या लग्नाशी संबंधित माहिती शेअर केली. काकीने सांगितलं की, प्रभासचं लग्न लवकरच होणार असून देवीमातेचा त्याच्यावर आशीर्वाद आहे.

Image credits: instagram
Marathi

मीडियाला असेल आमंत्रण?

प्रभासची काकी शामला देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभास जेव्हा लग्नगाठ बांधेल त्यावेळेस संपूर्ण मीडियाला आमंत्रण दिले जाईल.

Image credits: instagram
Marathi

काय आहे शामला काकींची ओळख?

शामला देवी या प्रभासचे काका कृष्णम राजू यांच्या पत्नी आहेत. कृष्णम राजू यांनी कित्येक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. दुर्दैवाने आज ते या जगात नाहीत.

Image credits: instagram
Marathi

प्रभास कोणासोबत करतोय लग्न?

शामला देवी यांनी विजयवाडा कनक दुर्गा मंदिराचे दर्शन घेतले. यावेळेसच त्यांनी प्रभासच्या लग्नासंदर्भात बातचीत केली. पण प्रभासच्या होणाऱ्या पत्नीबद्दल काहीही सांगितले नाही.

Image credits: instagram
Marathi

सिनेमे होताहेत फ्लॉप

वर्ष 2017 नंतर प्रभासचा एकही सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. साहो, राधे श्याम आणि आदिपुरुष हे सिनेमे बॉक्सऑफिस चांगलेच आपटले.

Image credits: instagram
Marathi

प्रभास करणार का कमबॅक?

प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' सिनेमाकडून प्रभासला फार अपेक्षा आहेत. 22 डिसेंबर रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमामध्ये अभिनेत्री श्रुती हासनचीही मुख्य भूमिका आहे.

Image credits: instagram
Marathi

शाहरुख आणि प्रभासमध्ये होणार सामना?

प्रभासचा 'सालार' आणि शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाची बॉक्सऑफिसवर टक्कर होताना दिसणार आहे.

Image credits: instagram

ड्रीम गर्ल हेमा मालिनींचा होता वाढदिवस, पण चर्चा होती या अभिनेत्रीची

रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका

महागड्या हीरोचा स्ट्रगल माहितीये? स्टारने दिलेत सलग 25 हिट सिनेमे

100 कोटी रुपये मानधन घेणारा हा सुपरस्टार कधीकाळी करायचा टॉयलेट स्वच्छ