Entertainment

South Cinema

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी प्रभासने 50 कोटी रूपयांची केलीय मदत?

Image credits: Social Media

जगभरात प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची धूम

जगभरात राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची धूम पाहायला मिळत आहे. येत्या 22 जानेवारीला असणाऱ्या सोहळ्यानिमित्त अमेरिकेत खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Image credits: twitter

राम मंदिरासाठी दान

राम मंदिराच्या बांधकामासाठी देशातील जनतेकडून दान करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती ते देशातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.

Image credits: wikipedia

प्रभासकडून राम मंदिरासाठी दान?

काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की, राम मंदिराच्या उद्घटनाआधी अभिनेता प्रभासने 50 कोटी रूपये दान केले आहेत.

Image credits: Social Media

प्राणप्रतिष्ठेवेळी भोजनाचा खर्च प्रभास उचलणार?

आंध्र प्रदेशचे आमदार चिरला जग्गीरेडी यांनी दावा केलाय की, प्रभास राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी भोजनाचा खर्च उचलणार आहे.

Image credits: Social Media

प्रभासने खरंच मंदिरासाठी दान केलेय?

रिपोर्ट्सनुसार, प्रभासच्या टीमने अभिनेत्याने देणगी दिल्याच्या बातम्यांचे खंडण केले आहे. अभिनेत्याने राम मंदिरासाठी केलेल्या दानासंदर्भातील बातम्या खोट्या असल्याचेही सांगण्यात आलेय.

Image credits: Social Media

सूत्रांनी दिलीय ही माहिती

रिपोर्ट्सनुसार, प्रभास संबंधित सूत्रांनी म्हटले अभिनेत्याने कोणत्याही प्रकारचे दान केलेले नाही ना त्या दिवशी तो भोजनाचा खर्च उचलणार आहे.

Image credits: Social Media

प्रभासचा अपकमिंग सिनेमा

'Kalki 2898 AD' आणि 'द राजा साब' सिनेमातून प्रभास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी प्रभासचा 'सालार पार्ट 1: सीझफायर' सिनेमा प्रदर्शित झाला होता.

Image credits: Social Media