Entertainment

Bollywood

ईशा देओल पतीला देणार घटस्फोट? सोशल मीडियावरील पोस्टने दिली हिंट

Image credits: instagram

पतीपासून विभक्त होणार ईशा देओल?

मीडियात सुरू असलेल्या बातम्यांनुसार जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल पती भरत तख्तानीपासून विभक्त होणार आहे.

Image credits: instagram

ईशा देओलचे नाते मोडणार असल्याची अफवा

बी-टाउनमध्ये सध्या ईशा देओल व भरत तख्तानी यांच्यामधील नाते मोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याची सुरुवात खरंतर व्हायरल झालेल्या एका पोस्टच्या माध्यमातून झाली.

Image credits: instagram

रिलेशनशिपमध्ये दूरावा?

ईशा देओल-भरत तख्तानी यांच्या नात्यात दूरावा येणार असल्याची हिंट एका पोस्टमधून समोर आली. एका रेडिट युजरने पोस्टमध्ये ईशाने पतीसोबतचे फोटो शेअर करणे बंद केल्याचे लिहिले आहे. 

Image credits: instagram

आईसोबत सध्या दिसतेय ईशा

ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून आई हेमा मालिनी यांच्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसून येत आहे.

Image credits: instagram

आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला उपस्थिती

आमिर खान याच्या लेकीचे रिसेप्शन नुकतेच मुंबईत पार पडले. यावेळी ईशा देओल पतीसोबत नव्हे तर आईसोबत दिसली.

Image credits: instagram

ईशाच्या नात्यात फूट पडणार असल्याची पोस्ट

ईशा पतीपासून विभक्त होणार असल्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. 

Image credits: instagram

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले, दिवाळीच्या पार्टीमध्ये ईशा एकटी दिसली. दुसऱ्याने म्हटले, हेमा मालिनींच्या वाढदिवाला पती भरत दिसला नाही.

Image credits: instagram

रिलेशनशिप मोडण्यावर ईशाचे मौन

ईशा देओल पतीपासून विभक्त होणार असल्याचा बातम्यांबद्दल तिने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट सोशल मीडियावर ईशा व भरत एकमेकांना फॉलो करत आहेत.

Image credits: Social Media

ईशा देओलचा विवाह

ईशा देओलने भरत तख्तानी याच्यासोबत वर्ष 2012 मध्ये विवाह केला होता. हेमा मालिनी- धर्मेंद्र यांच्या मुलीचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला होता.

Image credits: instagram

ईशा देओलला दोन मुली

ईशा देओलला राध्या आणि मिराया अशा दोन मुली आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Image credits: instagram