सुंदर अशी डिझाइनर व्हाईट रंगाची साडी आणि त्यावर स्लिव्हलेस किंवा तुमच्या आवडीनुसार ब्लू रंगाचं ब्लाउस तुम्ही ट्राय करू शकता
खरं तर साडी साधी असली की त्यावर डिझाइनर ब्लाउस उठून दिसत त्यामुळे प्रार्थनाच हा लुक तुम्ही तुमच्या आवडत्या रंगात रिक्रिएट करू शकता.
आजकाल बाजारपेठेत फ्लोरल प्रिंटच्या साड्या मोठ्या प्रमाणात आणि वेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहे. त्यावर प्रार्थनाने ट्राय केलेलं वेस्टर्न ब्लाउस असा देखील लुक ट्राय करायला हरकत नाही
पेस्टल रंगाची डिझाइनर साडी आणि त्यावर डार्क असं ब्लाउस . आजकाल हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
आजकाल साडीच्या विरुद्ध रंगाचं ब्लाउस घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे साडीही उठून दिसते आणि वेगळे ब्लाउस देखील ट्राय करता येतात. मात्र यामुळे आपला लुक आणखीनच उठून दिसतो
पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशन हे सगळ्यात कॉमन आहे. मात्र यावर ज्वेलरी जर वेगळी ट्राय केली तर मात्र तुम्ही सगळ्या पार्टीत उठून दिसणार.
महाराष्ट्रात प्रत्येक कार्यक्रमाला पैठणी साडी तर हवीच.प्रार्थना सारखं स्लिव्हलेस ब्लाउस देखील तुम्ही ट्रे करा किंवा प्लेन पैठणी आणि त्यावर डिझाइनर ब्लाउस असाही लुक तुम्ही करू शकता.