बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राला सगळे प्रेमाने 'पिगी चॉप्स' म्हणतात.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला तिचे आई-वडील लाडाने 'पोटॅटो' (बटाटा) म्हणतात. लहानपणापासूनच तिला याच नावाने हाक मारली जाते.
विराट कोहली आणि जवळचे मित्र-मैत्रिणी अनुष्का शर्माला 'नुष्की' या नावाने हाक मारतात. अनुष्काचं लहानपणीचं नाव 'नुष्केश्वर' असं होतं, असंही म्हटलं जातं.
विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला सगळे 'ऐश' म्हणतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण तिचे कुटुंबीय तिला 'गुल्लू' या नावाने हाक मारतात.
सोनम कपूरला तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय 'जिराफ' म्हणून हाक मारतात. खुद्द सोनमनेच एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशाला अनेक टोपणनावांनी ओळखलं जातं. तिचे जवळचे मित्र तिला 'ट्रॅश' आणि 'हनी ट्रिश' या नावांनी हाक मारतात.
लावण्या त्रिपाठीला तिचे आई-वडील 'चुन चुने' म्हणायचे. लहानपणी लावण्या एक कविता म्हणायची, त्यातील एका शब्दावरूनच तिचं हे टोपणनाव ठेवलं गेलं होतं.
Patriotic Movies : देशासाठी लढलेल्या वीरांची गोष्ट... स्वातंत्र्यदिनी OTT वर पाहा देशभक्तीवर सिनेमे
पूजा सावंतच्या आजीनं बनवला गोड शिरा, व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात
नॅशनल क्रश गिरीजाला पुणेकरांनी का आणलं जमिनीवर?
वजनामुळं सुबोध भावे झाला होता रिजेक्ट, नंतर या चित्रपटात झाली निवड