Marathi

देशभक्तीने भारलेले चित्रपट

भारत १५ ऑगस्ट रोजी आपला ८०वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या खास दिवशी, देशभक्तीपर जागवणारे काही सुपरहिट चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

Marathi

धुरंधर भाग १ आणि २ - नेटफ्लिक्स

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ अॅक्शन थ्रिलर चित्रपट. कराचीतील दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसलेल्या भारतीय गुप्तहेराची कथा आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त प्रमुख भूमिकेत आहेत.

Image credits: social media
Marathi

ऑपरेशन सफेद सागर - नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्सवर आलेली 'ऑपरेशन सफेद सागर' ही सीरिज १९९९ च्या कारगिल युद्धावर आधारित आहे. यात भारतीय हवाई दलाच्या शौर्याची गाथा दाखवण्यात आली आहे.

Image credits: social media
Marathi

सॅम बहादूर - झी ५

हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे.

Image credits: social media
Marathi

भुज: द प्राइड ऑफ इंडिया - डिज्नी+ हॉटस्टार

या चित्रपटात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने दाखवलेल्या शौर्यावर आधारित आहे.

Image credits: social media
Marathi

रंग दे बसंती - डिज्नी+ हॉटस्टार

'रंग दे बसंती' काही कॉलेज मित्रांचा चित्रपट आहे. स्वातंत्र्यसैनिकांवर डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर त्यांना देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते आणि ते भ्रष्टाचाराविरोधात लढा देतात.

Image credits: social media
Marathi

द गाझी अटॅक - प्राइम व्हिडिओ

'द गाझी अटॅक' चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय पाणबुडी S21 आणि पाकिस्तानी पाणबुडी PNS गाझी यांच्यातील नौदल युद्धावर चित्रपट केंद्रित आहे.

Image credits: social media
Marathi

उरी: द सर्जिकल स्ट्राइक - झी ५

हा वॉर अॅक्शन चित्रपट २०१६ च्या उरी हल्ल्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे. विकी कौशलने यात पॅरा (स्पेशल फोर्स) मेजर विहान शेरगिल यांची मुख्य भूमिका साकारली आहे.

Image credits: social media
Marathi

राझी - प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स

‘राझी’ अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करून त्याच्या घरात गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या भारतीय तरुणीची कथा आहे.

Image credits: social media

पूजा सावंतच्या आजीनं बनवला गोड शिरा, व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात

नॅशनल क्रश गिरीजाला पुणेकरांनी का आणलं जमिनीवर?

वजनामुळं सुबोध भावे झाला होता रिजेक्ट, नंतर या चित्रपटात झाली निवड

गिरीजा ओक अभिनय सोडून टाकणार होती दुकान, नेमकं असं काय झालं होतं?