Marathi

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे कलाकार पहिल्यांदाच चमकले होते

Marathi

गोविंदा

गोविंदाने 2004 मध्ये राजकीय पदार्पण केले.गोविंदाने काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईतून निवडणूक जिंकली होती. गोविंदाने भाजपचे खासदार आणि ताकदवान नेते राम नाईक यांचा पराभव केला होता

Image credits: Our own
Marathi

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात हात आजमावला होता. त्यांनी जवळचे मित्र राजीव गांधी यांच्या सल्ल्याने 1984 त अलाहाबाद लोकसभा निवडणूक लढवली.त्यांनी ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकली.

Image credits: Social Media
Marathi

धर्मेंद्र देओल

धर्मेंद्र देओल राजकारणात दमदार आहेत.राजस्थानच्या बिकानेरमधून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे.मात्र लोकसभा मतदारसंघात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती

Image credits: Twitter
Marathi

सनी देओल

सनी देओलने 2019मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. सनी देओलने काँग्रेसच्या सुनील जाखड यांच्यावर 82,459 मतांनी विजय मिळवला होता.

Image credits: instagram
Marathi

किरण खेर

किरण खेर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणात प्रवेश केला. चंदीगडमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पवन बन्सल यांचा पराभव केला.

Image credits: social media
Marathi

राज बब्बर

ज्येष्ठ अभिनेते राज बब्बरही पहिल्याच प्रयत्नात निवडणूक जिंकून खासदार झाले आहे.1999 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आग्रा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Image credits: Our own
Marathi

हेमा मालिनी

हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये राजकीय प्रवासाला सुरुवात केली. याआधी 2003-09 पर्यंत राज्यसभेच्या सदस्य होत्या. 2014 मध्ये मथुरामधून भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा विजयी झाल्या होत्या.

Image credits: Instagram
Marathi

कंगना रणौत

बॉलिवूडमध्ये छाप पाडल्यानंतर कंगना राणौत यावेळी राजकारणात हात आजमावला आणि पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला.या विजयाने तिचे कुटुंबीय आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

Image Credits: instagram