सलमान खानच्या मागे लॉरेन्स बिष्णोई हा हात धुवून लागला आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या केली आहे.
सलमान खानच्या सुरक्षेत काही दिवसांपासून वाढ करण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सलमान सोबत बंदूक घेतलेले जवान फिरतात.
१९९८ मध्ये सलमान खानने काळ्या हरिणांची शिकार केली होती. त्यानंतर लॉरेन्स बिष्णोई त्याच्या मागे हात धुवून लागला आहे.
बिष्णोई समाज हा काळ्या हरणांना देव मानतो, त्यामुळे सलमान खानने या हरिणांची हत्या केल्यामुळे हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
लॉरेन्स बिष्णोई या प्रकरणावर न्यायालय कोणतीही शिक्षा सुनावू शकत नाही त्यावर फक्त बिष्णोई समाज निर्णय घेईल असं म्हटलं आहे.
लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खान आणि त्याच्या वडिलांनी सार्वजनिकरित्या आमची माफी मागावी असं म्हटलं होत. तरच आम्ही माफ करू असंही त्यानं यावेळी बोलताना सांगितलं.
सलमान खान या प्रकरणावर माफी मागणार नाही आणि त्यामुळे त्याच्या जीविताला धोका निर्माण होताना दिसून येत आहे.