Marathi

नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमाची चर्चा, झळकणार हे कलाकार

Marathi

कुस्तीपटू खाशाबा जाधवांवर सिनेमा

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा खाशाबा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यावर आधारित आहे. या सिनेमात अनेक दमदार कलाकारही झळकणार आहेत.

Image credits: Social media
Marathi

सिनेमाचा टीझर लाँच

'खाशाबा' सिनेमाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला. या टीझरमध्ये कुस्तीचा आखाडा, लाल माती आणि पैलवानांची झुंज दिसून येत आहेत. याशिवाय सिनेमात काही दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. 

Image credits: Social media
Marathi

नागराज मंजुळे

खाशाबा सिनेमात खुद्द नागराज मंजुळे झळकणार आहे. त्यांचा सिनेमातील लूक समोर आला आहे. पण कोणत्या नावाची भूमिका साकारणार हे अद्याप कळलेले नाही.

Image credits: Social Media
Marathi

जितेंद्र जोशी

Image credits: Social media
Marathi

महेश मांजरेकर

सिनेमामध्ये महेश मांजकेर देखील भूमिका साकारणार आहेत. महेश मांजरेकर यांनी सफारी आणि रंगीत फेटा घातल्याचा लूक केला आहे. यावरुन अंदाज लावू शकतो की, त्यांची खास भूमिका असणार आहे. 

Image credits: Social Media
Marathi

ओम भूतकर

खाशाबा सिनेमात ओम भूतकर देखील झळकणार आहे. यामध्ये ओम भूतकरने लाल रंगातील पगडी परिधान केली आहे. याशिवाय त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमता सिनेमातील त्याच्या भूमिकेबद्दल सांगून जातेय. 

Image credits: Social Media
Marathi

कोण साकारणार खाशाबांची भूमिका?

सिनेमातील मुख्य भूमिका ‘खाशाबा’ कोणता कलाकार साकारणार यावर अद्याप सस्पेंस आहे. यामुळे कोण करणार ही भूमिक याची चर्चा रंगली आहे. 

Image credits: Social media
Marathi

सिनेमातील गाण्यांना अजय-अतुलची साथ

सिनेमासाठी संगीत अजय-अतुल यांनी केले आहे. याशिवाय जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रोडक्शनच्या बॅनरखाली सिनेमा तयार केला जात आहे. सिनेमा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रिलीज होणार आहे.

Image credits: Social media

प्रेम इतकं असावं की गुदमरून जायला हवं, सई ताम्हणकर असं का बोलली?

नॅशनल क्रश गिरिजा ओकचे बाबांवर प्रेम पण दुरावा

गौतमी पाटील परत बैलासमोर नाचणार का, उत्तर वाचून म्हणाल तुलाच जमलं

प्राजक्ता तेलगू चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, या रोलमध्ये मिळालं काम?