कंगना राणौतला लोकसभेसाठी भाजपाने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिकीट दिले आहे. 14 मे ला अभिनेत्रीने उमेदवारी अर्ज भरत आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
कंगना राणौत भाजपामधील लक्षाधीश असणाऱ्या उमेदवारांपैकी एक आहे. सिनेमांव्यतिरिक्त अभिनेत्री जाहिरातींच्या माध्यमातून बक्कळ कमाई करते.
निवडणुक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात अभिनेत्रीने तिच्याकडे 90 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे सांगितले आहे. याशिवाय 28.73 कोटींची चल आणि 62.9 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे.
शपथपत्रानुसार, कंगना राणौतवर 17.38 कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे 2 लाख रुपयांची रोकड आहे.
कंगना राणौतकडे 6.700 किलो सोनं असून याची किंमत 5 कोटी रुपये आहे. याशिवाय 60 किलो चांदी असून याची किंमत 50 लाख रुपयांच्या आसपास आहे.
कंगना राणौतकडे कोट्यावधी रुपयांची हिऱ्यांची ज्वेलरी आहे. याची किंमत तीन कोटी रुपयांहून अधिक आहे.
निवडणुकीच्या शपथपत्रानुसार, कंगनाकडे BMW 7 सीरिज आलिशान कार आणि दुसरी Mercedes Benz GLE SUV आहे. या दोन्ही कारची किंमत 1.56 कोटी रुपये आहे.
कंगनाकडे 50 एलआयसी पॉलिसी आहेत. याशिवाय शेअर्समध्येही अभिनेत्रीने गुंतवणूक केलेली आहे. कंगनाकडे मणिकर्णिका फिल्म्सचे 9999 शेअर्स आहेत. यामधील गुंतवणूकीची रक्कम कोट्यावधी रुपये आहे.
कंगना राणौत एका सिनेमासाठी 15-20 कोटी रुपयांची फी घेते. याशिवाय जाहिरातींसाठी अभिनेत्री 3 कोटी रुपयांची फी घेते.
अभिनेत्री कंगना राणौतचे मुंबई आणि मनालीमध्ये आलिशान घर आहे. मुंबईतील घराची किंमत 20 कोटी तर मनालीतील बंगल्याची किंमत 25 कोटी रुपयांच्या आसपास आहे.