प्रभासचा Kalki 2898 AD सिनेमाचे बजेट 600 कोटी रुपये आहे. येत्या 27 जूनला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. जाणून घेऊया आतापर्यंतचे 10 महागड्या सिनेमांची लिस्ट...
प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो सिनेमा बॉक्स ऑफिसवर महाफ्लॉप ठरला. 350 कोटी रुपयांच्या सिनेमाने बजेटचा आकडा देखील पार केला नाही.
रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 2.O सिनेमाचे बजेट 600 कोटी रुपये आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांची कमाई केली होती.
अक्षय कुमार-टायगर श्रॉफ यांचा बड़े मियां छोटे मियां सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला. 350 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या सिनेमाने केवळ 95 कोटी रुपयांची कमाई केली.
सलमान खान आणि कतरिना कैफचा टायगर 3 सिनेमाचे बजेट 300 कोटी रुपये होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 467 कोटी रुपयांची कमाई केली होती.
आमिर खआन आणि अमिताभ बच्चन यांचा सिनेमा ठग्स ऑफ हिंदोस्तान सुपर फ्लॉप ठरला. सिनेमाचे बजेट 300 कोटी रुपये होते.
राम चरण-ज्युनिअर एनटीआर यांचा सिनेमा आरआरआर देशातील सर्वाधिक महागड्या सिनेमांपैकी आहे. सिनेमाचे बजेट 550 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर आरआर सिनेमाने 1387 कोटींची कमाई केली होती.
शाहरुख खान आणि नयनतारा स्टारकास्ट असणाऱ्या जवान सिनेमा सुपर हिट ठरला. 300 कोटी रुपये बजेट असणाऱ्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1148 कोटी रुपयांची कमाई केली होती.
थलापति विजयच्या लियो सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. 300 कोटींचे बजेट असणाऱ्या सिनेमाने 620 कोटी रुपायांची कमाई केली होती.
प्रभास आणि कृती सेनन यांचा आदिपुरुष सिनेमाचे बजेट 700 कोटी रुपये होते. देशातील सर्वाधिक महागड्या सिनेमांपैकी एक असणारा आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर आपटला गेला.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या बम्हास्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सिनेमाच्या 400 कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा अत्याधिक कमाई झाली होती.