टॉलिवूड निर्माते रामोजी राव यांनी वर्ष 1996 मध्ये रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली होती.
हैदराबादला आल्यानंतर तुम्ही रामोजी फिल्म सिटीला नक्की भेट देऊ शकता. येथे तुम्हाला थीम पार्क ते सिनेमांच्या सेटवर फोटो काढण्याचा आनंद लुटता येईल.
रामोजी फिल्म सिटीमध्ये तुम्हााल जगभरातील विविध संस्कृतींचे दर्शन घेता येईल.
आशियातील सर्वाधिक मोठे अॅडवेंचर पार्क म्हणून साहस पल्स ऑफ अॅडवेंचरला ओखळले जाते. येथे सर्व अॅडवेंचर गोष्टी तुम्हाला करता येतात.
रामोजी फिल्म सिटीत आजवर अनेक सिनेमांचे शूटिंग झाले आहे. सलमान खान ते शाहरुखसह साउथमधील आगामी सिनेमा पुष्पा-2 चे देखील शूटिंग रामोजीत झाले आहे.
रामोजी फिल्म सिटीत बुद्धांच्या गुहेची देखील प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
न्यूय़ॉर्कमधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या येथे प्रत्यक्षात जाता येत नसले तरीही तुम्ही हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीत त्याच्यासोबत फोटो काढू शकता.
रामोजी फिल्म सिटीत द किड्स पार्क आहे. येथे मुलांना मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटता येईल.
पॅरिसमधील जगप्रसिद्ध वास्तू आयफेल टॉवरच्या खाली उभे राहून फोटो काढण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण तुम्हाला रामोजी फिल्म सिटीमध्ये आयफेल टॉवरची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे.