अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चला, जाणून घेऊया टॉप १० चित्रपटांची यादी
सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजान जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने ९११ कोटींची कमाई केली होती.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत रणबीर कपूरचा 'ॲनिमल' वर्ल्डवाइड चित्रपट ९ व्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने ९२९.१ कोटी रुपयांची कमाई केली होती
प्रभासचा 'कल्की २८९८एडी' हा चित्रपट देखील जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत आहे. या चित्रपटाने १०१९ कोटींचा व्यवसाय केला
जगभरात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट ७ व्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने १०४२.२ कोटींचा व्यवसाय केला.
जगभरात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांमध्ये शाहरुख खानचा 'जवान' सहाव्या स्थानावर आहे. या चित्रपटाने ११४२.६ कोटींची कमाई केली होती
यशचा चित्रपट 'KGF 2' हा जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाने ११७६.५ कोटींचा व्यवसाय केला.
ज्युनियर एनटीआर-राम चरण यांच्या 'आरआरआर' चित्रपटानेही जगभरातील बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटाने १२५० कोटींचा व्यवसाय केला.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाचे वादळ थांबत नाहीए. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरातील बॉक्स ऑफिसवर १५०४ कोटींचा व्यवसाय केला आहे.
प्रभासचा चित्रपट बाहुबली २ जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाने १७४२ कोटींचा व्यवसाय
जगभरात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणजे आमिर खानचा 'दंगल'. या चित्रपटाने २०२४ कोटींचा व्यवसाय केला.