भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ परत एकदा चर्चेत आला आहे. २०२५ मध्ये पृथ्वीला एकाही आयपीएल टीमने खरेदी केलं नाही.
पृथ्वी शॉ या खेळाडूला विजय हजारे या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर त्यानं भावुक होऊन पोस्ट केली आहे.
पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड निधी तापडिया दिसायला सुंदर असून स्टाईलिश दिसते. निधीला मिस्ट्री गर्ल म्हणून ओळखले जाते.
पृथ्वी आणि निधी या दोघांची ओळख एका पार्टीच्या दरम्यान झाली होती. त्यानंतर पृथ्वीने तिच्यावर एक पोस्ट टाकली होती.
निधी ही मॉडेल आणि एक्ट्रेस आहे. २०१६ पासून अभिनयाला सुरुवात केली असून तिने अभिनयातून चमक दाखवली आहे.
सीआयडीमध्ये निधीने काम केलं आहे. सोनी टेलिव्हिजनच्या मालिकेत काम करणारी निधी ही नाशिक येथील राहणारी आहे.