दुल्कर सलमान स्टारर चित्रपटाने नेटफ्लिक्सवर इतिहास रचला आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी या व्यासपीठावर आलेल्या या चित्रपटाने एक वगळता साऊथच्या प्रत्येक चित्रपटाला मात दिली आहे.
'लकी भास्कर' हा नेटफ्लिक्सवर दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा दक्षिण भारतीय चित्रपट ठरला आहे. कोइमोइच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाला दोन आठवड्यात ११.७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
आत्तापर्यंत नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला दक्षिण भारतीय चित्रपट 'महाराजा' आहे. विजय सेतुपती अभिनीत या तमिळ चित्रपटाला नेटफ्लिक्सवर १९.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
या यादीत तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर तेलुगुचा देवरा भाग १, कल्की २८९८ एडी आणि तमिळचा इंडियन २ आहे. ज्यांना अनुक्रमे ८.६ दशलक्ष, ८ दशलक्ष आणि ६.८ दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत.
'लकी भास्कर' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. अवघ्या ३० कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात ७२.६८ कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरात १११.२२ कोटी रुपयांची कमाई केली.
वेंकी अल्लुरी दिग्दर्शित हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. दुलकर सलमानसोबतच मीनाक्षी चौधरी व टिनू आनंद या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.