Marathi

कोण आहेत मुश्ताक खान? ज्यांचे अपहरण करून केला छळ, कशी झाली सुटका?

Marathi

कोण आहेत मुश्ताक खान?

मुश्ताक खान हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वर्षी ते 'स्त्री २' या ब्लॉकबस्टर चित्रपटातही दिसले होते.

Image credits: instagram
Marathi

मुश्ताक खान यांचे अपहरण

वृत्तांनुसार मुश्ताक खान यांचे अपहरण झाले होते. त्यांचा बिझनेस पार्टनर शिवम यादव याने सांगितले की, २० नोव्हेंबर रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

Image credits: instagram
Marathi

मुश्ताक खान यांची फसवणूक करून केले अपहरण

मुश्ताक खान यांची फसवणूक करून अपहरण करण्यात आले होते. त्यांना एका सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले.

Image credits: instagram
Marathi

मुश्ताक खान यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना कुठे ठेवले होते?

वृत्तां नुसार, मुश्ताक खान यांचे अपहरण करून बिजनौरच्या निर्जन भागात एका घरात ओलीस ठेवले होते. यावेळी त्यांच्याकडून खंडणीची मागणी करून त्यांचा छळही करण्यात आला.

Image credits: instagram
Marathi

मुश्ताक खान यांचा जीव कसा वाचला

ज्या घरात मुश्ताक खान यांना अपहरण केल्यानंतर ठेवण्यात आले होते, त्या घराजवळ एका मशिदीतून अजानचा आवाज आला. स्वतःला वाचवण्यासाठी ते मशिदीकडे धावले. तेथील लोकांकडे मदत मागितली.

Image credits: instagram
Marathi

मुश्ताक खान यांनी दोन लाख रुपये दिले

वृत्तांनुसार मुश्ताक खान यांनी दोन लाख रुपयांहून अधिक खंडणी दिली होती. मात्र, त्यांचा व्यावसायिक भागीदार शिवम यादव याने सांगितले की, अपहरणकर्त्यांनी १ कोटी रुपयाची मागणी केली होती.

Image credits: instagram
Marathi

मुश्ताक खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले

मुश्ताक खान गेल्या ३ दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. वेलकम, हम है राही प्यार के, आशिकी, गोपी किशन, राजा, बाजी, अकेले हम अकेला तुम यासह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

Image credits: instagram
Marathi

मुश्ताक खान 'वनवास' चित्रपटात दिसणार आहेत

'गदर २'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा 'वनवास' हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर-उत्कर्ष शर्मासोबत मुश्ताक खानही दिसणार आहेत.

Image credits: instagram

प्राजक्ता माळीचे वजन किती, लोक म्हणाले वजन कमी करू नको

पुष्पा २ मधील स्टार किती शिकलेले, कोण सर्वात जास्त एज्युकेटेड?

शाहरुख खानचा मुलगा अबरामची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क!

७ चित्रपटांची १००० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, पुष्पा २ने किती कमवले?