अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली जमीन, किंमत ऐकून व्हाल हैराण
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जमीन 14.5 कोटी रूपयांना खरेदी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील डेव्हलपर द हाउस ऑफ अभिनंदन लोढा यांच्याकडून 7 स्टार एन्क्लेव्ह, द शरयू येथे जमीन खरेदी केली आहे.
हाउस ऑफ अभिनंदन लोढा यांनी अद्याप घराच्या आकाराबद्दल खुलासा केलेला नाही. पण सूत्रांनुसार, ही जमीन 10 हजार स्क्वेअर फूटांची असल्याचे सांगितले जातेय.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळीच 51 हजार एकर जमिनीवर विस्तारलेल्या ‘द शरयू प्रकल्प’ लाँच होणार आहे. प्रकल्प मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.
अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या जमिनीपासून अर्ध्या तासावर विमानतळ आहे. मार्च, 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. याशिवाय पंचतारांकित पॅलेस हॉटेलही उभारले जाणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी प्रकल्पासंदर्भात म्हटले की, "मी अयोध्येतील द शरयूसाठी द हाउस ऑफ अभिनंदन लोढा यांच्यासोबत जर्नी सुरू करण्यासाठी उत्साहित आहे."
अयोध्येचे हृदयात एक विशेष स्थान असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.