बिग बॉस ओटीटी 3 विजेती Sana Makbul चा प्रियकर बुरेड्डी नक्की काय करतो?
Entertainment Aug 03 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
बिग बॉस ओटीटी-3 विजेती
बिग बॉस ओटीटी -3 ची विजेती अभिनेत्री आणि मॉडेल सना मकबूल जिंकली आहे. सनाला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचे पारितोषकही देण्यात आले आहे. टॉप-2 मध्ये सनासोबत रॅपर नॅजी होता.
Image credits: Instagram
Marathi
सनाला प्रियकराने दिल्या शुभेच्छा
सनाचा प्रियकर श्रीकांत बुरेड्डी याने तिला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये श्रीकांतच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी असून ‘ती जिंकली’ असे लिहिल्याची स्टोरी शेअर केली आहे.
Image credits: Instagram
Marathi
कोण आहे श्रीकांत बुरेड्डी?
श्रीकांत बुरेड्डी बडीलोन कंपनीसह अन्य काही कंपन्यांचा संस्थापक आहे. कथित रुपात सना मकबूल त्याच्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
Image credits: Instagram
Marathi
बिग बॉसच्या घरात जाण्याआधी सनाचा वाढदिवस
सना मकबूल बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तिचा धुमधडाक्यात वाढदिवस श्रीकांत बुरेड्डीकडून साजरा करण्यात आला होता. यावेळी सना आणि श्रीकांतसोबत अत्यंत खुश असल्याचे दिसून आले होते.
Image credits: Instagram
Marathi
टेलिव्हिजन क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती
सनाच्या वाढदिवसानिमित्त टेलिव्हिजन क्षेत्रातील काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. याचा एक व्हिडीओ श्रीकांत बुरेड्डीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
Image credits: Instagram
Marathi
कोण आहे सना मकबूल?
मुंबईत राहणारी सना अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2009 मध्ये सना MTV स्कूटी टीन दिवामध्ये झळकली होती. तसेच म्युझिकल सीरिजमध्ये सना दिसली होती. खतरो के खिलाडीमधून सनाला प्रसिद्धी मिळाली.
Image credits: Instagram
Marathi
सनाचे सिनेमे आणि मालिका
सनाने काही टीव्ही शो आणि साउथ सिनेमांमध्येही काम केले आहे. 'इस प्यार को क्या नाम दूं?', 'अर्जुन विष', 'आदत से मजबूर', 'कितनी मोहब्बत है-2' मध्येही सनाने काम केले आहे.