सुशांतसोबतचे नाते का आले होते संपुष्टात? इतक्या वर्षांनंतर अंकिताने सोडले मौन
Entertainment Oct 31 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Social Media
Marathi
अंकिता-सुशांतची जोडी
अंकिता लोखंडे व सुशांत राजपूत टीव्ही इंडस्ट्रीतील एक सुंदर व क्युट जोडपे म्हणून प्रसिद्ध होते. दोघंही लग्न करणार होते. पण यापूर्वीच त्यांचे नाते संपुष्टात आले.
Image credits: Social Media
Marathi
'जगणं असह्य झाले होते'
सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता पूर्णपणे कोलमडली होती. सर्व विसरून आयुष्यात पुढे जाणे खूप कठीण होते. या कठीण काळातून बाहेर येण्यासाठी खूप वर्ष गेल्याचे तिनं सांगितले.
Image credits: Social Media
Marathi
'माझ्या पालकांनाही त्रास झाला'
बिग बॉस-17 या रिअॅलिट शोमध्ये सहभागी झालेल्या अंकिताने मुनव्वर फारुकीसोबत बोलताना ब्रेकअपचे कारण सांगितले. आमचे नाते तुटल्यानंतर माझ्यासह पालकांनाही त्रास झाला.
Image credits: Social Media
Marathi
'एका रात्रीत सारं काही बदललं'
अंकिता पुढे असंही म्हणाली की, 'अचानक एका रात्रीत सारे काही बदलले, जेव्हा सुशांतने ब्रेकअप केल्याचे सांगितले.'
Image credits: Instagram
Marathi
ब्रेकअपचे कारण...
'ब्रेकअपचे काहीही कारण नव्हते. एका रात्रीत माझे आयुष्य बदलले. आमच्यात काहीही वाद-भांडण झाले नव्हते. सारे काही अचानक घडले', असे अंकिताने सांगितले.
Image credits: Instagram
Marathi
'लोकांनी कान भरले'
अंकिता असेही म्हणाली की,'जेव्हा करिअरमध्ये आपण पुढे जाता, तेव्हा १० लोक तुमचे कान भरतात. जे काहीही असेल मला माहिती नाही. ठीक आहे, त्याचा निर्णय होता. मी त्याला कधी रोखले नाही'.
Image credits: Getty
Marathi
'सुशांतने ब्रेकअपचं कारण नाही सांगितलं'
'सुशांतच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसत नव्हते. त्याने ब्रेकअपचे कारणही सांगितलं नाही. त्याला केवळ वेगळे व्हायचे होते'.
Image credits: Getty
Marathi
'ब्रेकअपनंतर कधीही त्याला पाहिले नाही'
अंकिताने म्हटलं की ब्रेकअप झाल्याच्या दिवसानंतर तिने कधीही सुशांतला पाहिले नाही.