अनुराग कश्यप हिंदी सिनेमातील उत्कृष्ट निर्मात्यांपैकी एक मानला जातो. अनुरागने एकापेक्षा एक हटके सिनेमे तयार केले आहेत. अनुरागचे 4 सिनेमे जे प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी पहावेत.
अनुरागने आजवर अनेक सिनेमांसाठी निर्माता आणि दिग्दर्शन केले आहे. अनुरागचे पुढील सिनेमे आयुष्यावर भाष्य करतात पण त्याचा आयुष्यावरही प्रभाव पडला जातो.
वर्ष 2016 मध्ये आलेल्या रमन राघव 2.0 सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकी, विक्की कौशल असे कलाकार झळकले आहेत. यामध्ये माथेफिरु व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे.
वर्ष 2009 मध्ये रिलीज झालेल्या देव डी सिनेमाची कथा देवदास सिनेमाची प्रेरणा घेत तयार करण्यात आली आहे. सिनेमाची कथा लव्ह, ड्रग्जच्या अवतीभवती फिरणारी आहे.
वर्ष 2014 मध्ये आलेल्या अग्ली सिनेमाची कथा एका स्ट्रगलर अभिनेत्याच्या कथेसह समाजात फैलावलेल्या वाईटाबद्दलच्या काही गोष्टी सांगते. यामध्ये राहुल भट्ट आणि आलिया भट्ट झळकली होती.
वर्ष 2018 मध्ये आलेल्या लस्ट स्टोरीचे दिग्दर्शन अनुराग कश्यपसह जोया अख्तर, करण जौहर आणि दिबाकर बनर्जी यांनी मिळून केले होते. या चौघांनी मिळून एक सिनेमाची कथेचे दिग्दर्शन केले होते.
‘गुलाब जामून’, ‘रायफल क्लब’ आणि ‘किल बिल हिंदी रिमेक’ सिनेमे यंदाच्या वर्षात रिलीज होणार आहेत. या सिनेमांसाठी अनुरागने दिग्दर्शन केले आहे.