Entertainment

UAE मध्ये संगीत,तर लंडनमध्ये लग्न असे होणार राधिका-अनंतचा विवाहसोहळा

Image credits: social media

या दिवशी घोड्यावर स्वार होणार अनंत अंबानी

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 12 जुलै 2024 रोजी तो वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे.

Image credits: social media

जामनगरमध्ये पार पडला तीन दिवसीय विवाह सोहळा

लग्नाआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशन गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला, ज्यामध्ये बॉलिवूड, हॉलिवूड आणि अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Image credits: social media

लंडनमध्ये होणार लग्न

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलैमध्ये लंडनच्या स्टोक पार्क इस्टेटमध्ये होणार असल्याच्या चर्चा आहेत.

Image credits: social media

मुकेश अंबानींनी खरेदी केला आहे स्टोक पार्क इस्टेट

2021मध्ये मुकेश अंबानींनी स्टोक पार्क इस्टेटची खरेदी केली होती. या घराची किंमत 592 कोटी रुपये आहे.

Image credits: social media

हॉटेल 300 एकरवर बांधले आहे

असे सांगितले जात आहे की स्टोक पार्क इस्टेट हॉटेल 300 एकरवर बांधले गेले आहे. जे 1066 मध्ये बांधले गेले आणि 1760 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. यात 49 लक्झरी व्हिला आहेत.

Image credits: social media

हॉटेल स्वर्गासारखे सुंदर आहे

हे 5 स्टार हॉटेल स्वर्गासारखे सुंदर आहे. जिथे सर्व खोल्या आणि बाथरूममध्ये संगमरवरी लावण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये तीन रेस्टॉरंट्स, एक तलाव, कंट्री क्लब, स्पा आणि मोठी बाग आहे.

Image credits: social media

या हॉटेलमध्ये जेम्स बॉण्डच्या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे

या हॉटेलची सुंदरता पाहून क्वीन एलिझाबेथ २ ला देखील मोह आवरला नव्हता.एकेकाळी हे हॉटेल तिचे घर होते. तसेच या ठिकाणी जेम्स बॉण्डच्या चित्रपटाचे शूटिंग देखील झाले आहे.

Image credits: social media

लग्न लंडन तर संगीत अबुधाबीत

काही रिपोर्टनुसार राधिका आणि अनंतच्या संगीताचा कार्यक्रम अबूधाबीमध्ये होणार आहे. यावेळी अनेक दिग्गज कलाकार हजर राहणार असल्याचे देखील बोलल्या जात आहे

Image credits: social media