Entertainment

मैत्रिणीचा चित्रपट पाहून अमृता खानविलकर झाली भावुक! लिहिली खास पोस्ट

Image credits: social media

‘मायलेक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची लेक सनया या दोघींचा ‘मायलेक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.उमेश कामत प्रमुख भूमिकेत

Image credits: social media

चित्रपटाचा प्रीमिअर शो

अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची लेक सनया चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.चित्रपटाच्या प्रीमियर शोला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

Image credits: instagram

अमृता खानविलकर आवर्जुन उपस्थित

अमृता आणि सोनाली यांची गेली अनेक वर्षे एकमेकींशी घट्ट मैत्री आहे.अभिनेत्रीची लेक अमृताला मावशी अशी हाक मारते.त्यामुळे अमृता आवर्जुन उपस्थित होती. 

Image credits: social media

सोनाली खरे आणि सनायासाठी अमृता खानविलकरची खास पोस्ट

सोनाली तू या चित्रपटाचा मूळ गाभा आहेस. कितीही संकटं आली तरी आपल्या आयुष्याचा प्रवास आपल्याला असाच सुरू ठेवावा लागतो.तुझा खरंच खूप अभिमान वाटतो.पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Image credits: social media

मायलेक पाहणं हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव

मायलेक पाहणं हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव.सनाया तुझं मोठ्या पडद्यावरचं पदार्पण पाहून मी खरंच भावुक झाले. मी आणि तुझी आजी शेवटचा सीन पाहून खूप रडलो. तू काय कमाल अभिनय केला आहेस. 

Image credits: instagram

अमृताने केले मैत्रिणीचा चित्रपट पाहण्याचे आवाहन

दोघींनाही भरपूर प्रेम आणि आवर्जून हा चित्रपट पहा तुम्हला नक्की आवडेल अशी पोस्ट अमृताने केली आहे.

Image credits: instagram