सलमान 'टायगर 3' (२०२३) मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता व त्याचा पुढचा चित्रपट 'सिकंदर' २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. २०२४ मध्ये तो 'सिंघम अगेन' आणि 'बेबी जॉन'मध्ये दिसला.
२०२३ मध्ये शाहरुख खानने दोन ब्लॉकबस्टर (पठाण आणि जवान) आणि एक हिट (डंकी) दिले. पण २०२४ मध्ये त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला नाही. सध्या तो 'किंग'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे
आमिर खान २०२२ च्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता. २०२३ आणि आता २०२४ मध्येही त्याचा एकही चित्रपट आला नाही. तो २०२५ मध्ये 'सीतारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे
२०२४ मध्ये आयुष्मान खुरानाचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्याचा मागील चित्रपट 'ड्रीम गर्ल २' २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचा पुढचा चित्रपट ‘थामा’ आहे.
रणबीर कपूरने २०२३ मध्ये 'ॲनिमल' दिसला. पण २०२४ मध्ये त्याचा एकही चित्रपट आला नाही. २०२६ मध्ये त्याचे 'रामायण भाग १' आणि 'लव्ह अँड वॉर' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
२०२४ मध्ये पवन कल्याण यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. २०२३ मध्ये ते 'ब्रो'मध्ये दिसले. २०२५ मध्ये, ते 'हरी हरा वीरा मल्लू: भाग 1' आणि 'दे कॉल हिम ओजी'मध्ये दिसणार आहे.
तमिळ सुपरस्टार अजितचा मागील चित्रपट 'Thunivu' २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०२४ मध्ये त्यांचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.
२०२३ मध्ये तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी 'वॉल्टेयर वीराया' आणि 'भोला शंकर' या दोन चित्रपटांमध्ये दिसले. पण २०२४ मध्ये त्यांचा एकही चित्रपट आला नाही.
तेलगू सुपरस्टार राम चरण २०२२ मध्ये 'RRR' आणि 'आचार्य' या दोन चित्रपटांमध्ये मुख्य नायक म्हणून दिसला होता. पण २०२३ आणि २०२४ मध्ये त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.