विठ्ठलाच्या भक्ताची कथा ‘विठ्ठल माझा सोबती’ सिनेमातून मांडण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल भक्ताची कशी मदत करतो हे तुम्हाला सिनेमात पहायला मिळणार आहे.
वर्ष 2014 मध्ये प्रदर्शित झालेला रितेश देशमुखचा ‘लय भारी’ सिनेमाला प्रेक्षकांना फार आवडला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते.
पंढपुर वारीचा अद्भवूत अनुभव दाखवणारा ‘गजर’ सिनेमा तुम्ही आषाढी एकादशीला पाहू शकता. या सिनेमात चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत दिसून आला आहे.
सुरेश मस्के यांनी लिहिलेला ‘विठ्ठला तूच’ सिनेमा तुम्ही आषाढी एकादशीनिमित्त परिवारासोबत पाहू शकता. या सिनेमाला तूच माझा प्राण सखा...तूच माझा पाठीराखा अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.
श्रेयस जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘डंका...हरी’ नामाचा सिनेमा तुम्ही पाहू शकता. हा सिनेमा मराठीसह हिंदी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता.