अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कर स्लॅब ७ लाखांवरून १२ लाख रुपये करण्यात आला आहे. आता १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही. ७५,००० रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ मिळेल.
अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांचाही विचार करण्यात आला आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना अधिक कर सवलतीचा लाभ मिळेल. व्याज उत्पन्नावर सवलतीची मर्यादा ५०,००० वरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात स्वतःच्या वापरातील घरावर कर सवलत देण्यात आली आहे. जर तुमच्याकडे २ घरे असतील आणि दोन्हीमध्ये तुम्ही राहत असाल तर आता दोन्ही मालमत्तांवर कर सवलतीचा दावा करता येईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अद्ययावत कर परतावा (Updated Tax Return) दाखल करण्याची मुदत २ वर्षांवरून ४ वर्षे करण्यात आली आहे.
कर्करोग, दुर्मिळ आजार आणि अनेक दीर्घकालीन आजारांच्या ३६ जीवनरक्षक औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे हटवले आहे.