एका मुस्लिम देशाच्या चलनी नोटेवर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा फोटो आहे, हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? हा देश कोणता आहे आणि त्यांनी असं का केलं?
मुंबई : फक्त भारतातच नाही, तर भाषा, धर्म आणि देशांच्या सीमा ओलांडून जगभरात लोक गणेशाची पूजा करतात. विघ्नहर्ता गणपती संपूर्ण जगात पूजनीय आहे.
24
इंडोनेशियाच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो
सुमारे ८७ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाने आपल्या २०,००० रुपिया (Rupiah) नोटेवर गणपतीचा फोटो छापला आहे. नोटेच्या पुढच्या बाजूला गणपती आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री 'की हजर देवंतारा' यांचा फोटो आहे. मागच्या बाजूला विद्यार्थी असलेला एक वर्ग दिसतो. इंडोनेशियात गणपतीला शिक्षण आणि ज्ञानाची देवता मानतात, म्हणूनच या नोटेवर त्याला स्थान दिलं. असंही मानलं जातं की, १९९० च्या दशकातील आर्थिक संकटावेळी, विघ्नहर्ता गणपती आपल्या चलनाचं रक्षण करेल या श्रद्धेतून ही नोट चलनात आणली गेली.
34
१२८ फूट उंच गणपतीची मूर्ती
जपानच्या शिंगोन बौद्ध धर्मात लोक गणपतीला 'कांगितेन' नावाने ओळखतात. नशीब आणि व्यवसायात वाढीसाठी ते गणेशाची पूजा करतात. थायलंडमध्ये गणपतीला 'फ्रा फिकानेट' म्हणतात. तिथल्या चाचोएंगसाओ (Chachoengsao) प्रांतात गणपतीची सुमारे १२८ फूट (३९ मीटर) उंच कांस्य मूर्ती आहे. ही जगातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक आहे.
नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात गणपतीची चार मुख्य मंदिरे आहेत. तिथले लोक गणपतीला शहराचा संरक्षक मानतात. तिबेटी बौद्ध धर्मात गणपतीला विघ्न दूर करणारी देवता आणि संपत्ती देणारा कुबेर मानलं जातं. श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूरसारख्या देशांमध्येही गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.