गेल्या २० वर्षांपासून प्रेम देणाऱ्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांचे आभार मानताना मेस्सी म्हणाला की, स्टेडियममधील चाहत्यांचा आवाज ऐकण्याची त्याला आठवण येईल.
पण त्याने वचन दिलं की, एक समर्थक म्हणून तो नेहमी राष्ट्रीय संघाशी जोडलेला राहील.
'आता मी तुमच्यापैकीच एक असेन, जो बाहेरून संघाला पाठिंबा देईल,' असं त्याने आपल्या निरोपाच्या संदेशात म्हटलं आहे.
मेस्सीने त्याचे कुटुंब, प्रशिक्षक, सहकारी आणि फुटबॉल अधिकाऱ्यांचेही त्याच्या या विलक्षण प्रवासाचा भाग असल्याबद्दल आभार मानले.
तो अर्जेंटिनाचा सर्वात मोठा आधुनिक आयकॉन आणि या खेळाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक म्हणून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत आहे.
त्याच्या शेवटच्या शब्दांनी पॅशन, दबाव, दुःख आणि अंतिम विजय यावर आधारलेल्या कारकिर्दीचं सार सांगितलं: 'देवा, मला अर्जेंटिनियन बनवल्याबद्दल धन्यवाद. वामोस अर्जेंटिना!'