WHO Warning: जगभरात कानाशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या पहिल्या "वर्ल्ड रिपोर्ट ऑन हिअरिंग" नुसार, 2050 पर्यंत प्रत्येकी चारपैकी एका व्यक्तीला ऐकण्याची समस्या असू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
सध्या, जगातील पाचपैकी एकाला ऐकण्याची समस्या आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही समस्या जास्त आहे. संसर्ग, ध्वनी प्रदूषण आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकणे ही मुख्य कारणे आहेत.
24
आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी
अनेक देशांमध्ये कान, नाक, घसा (ENT) तज्ज्ञ आणि ऑडिओलॉजिस्ट यांची कमतरता आहे. प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये ऐकण्याच्या चाचणीला महत्त्व दिले जात नाही, त्यामुळे समस्या लवकर ओळखता येत नाही.
34
उपचार आणि तांत्रिक उपाय
काही कानाच्या समस्या औषधे किंवा शस्त्रक्रियेने बऱ्या होऊ शकतात. हिअरिंग एड्स, कॉक्लिअर इम्प्लांट्स यांसारखी उपकरणे मदत करतात. WHO च्या मते, या सेवेतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.
ऐकण्याच्या समस्या शिक्षण, नोकरी आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. यामुळे एकटेपणा आणि नैराश्य येऊ शकते. ध्वनी प्रदूषण कमी करणे, हेडफोनचा वापर मर्यादित करणे आणि वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे.