जागतिक आरोग्य संकट असलेल्या मंकीपॉक्स विषाणूविरोधात एक सकारात्मक खबर आहे. WHO ने मंकीपॉक्ससाठी पहिल्या लसीला मान्यता दिली आहे, जी "Bavarian Nordic" द्वारे विकसित केली गेली आहे.
WHO ने Bavarian Nordic A/S द्वारे निर्मित MV-BN लसीला प्रीक्वालिफाइड म्हणून मान्यता. लसीसाठी WHO चे महासंचालक डॉ. ॲधानोम यांनी निवेदन दिले असून लस महत्त्वाची आहे असे ते म्हणाले
ही लस 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी आहे. दोन डोस चार आठवड्यांच्या आत दिले जातात. एक डोस 76% प्रभावी आहे आणि दोन डोस घेतल्यास 80% संरक्षण मिळते.
लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात सुमारे 8 आठवडे साठवली जाऊ शकते. यामुळे, लस वितरण आणि साठवणूक सुलभ होते.
मंकीपॉक्सची लक्षणे पहिल्यांदा 1970 मध्ये काँगोमधील एका मुलामध्ये दिसली होती. या विषाणूच्या लक्षणांचा शोध घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी या विषाणूला "मंकीपॉक्स" नाव दिले.
अमेरिका, सिंगापूर, स्वित्झर्लंड, कॅनडा, युनायटेड किंगडम यासारख्या देशांत या लसीला मान्यता मिळाली आहे. यामुळे, लोकांच्या आरोग्यावर लसचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल अशी अपेक्षा आहे.
भारतात 8 सप्टेंबर 2024 रोजी मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळला. हा व्यक्ती परदेश दौऱ्यावर असताना संसर्गित झाला होता आणि त्यानंतर भारतात आल्यानंतर आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले.
Mpox विषाणू संक्रमित व्यक्ती, प्राण्याच्या संपर्कातून शारीरिक संबंधाद्वारे किंवा संक्रमित वस्तूंच्या संपर्काद्वारे पसरतो. लाळ, कपडे, अंथरूण आणि टॉवेल यांच्याद्वारे संसर्ग होऊ शकतो.
Mpox संसर्ग झाल्यावर त्वचेवर लाल पुरळ, ओरखडे, चेचक सारखे पू असलेले पुरळ आणि स्नायू दुखणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. असे लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.