नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान सध्या तुरुंगात कैद आहेत आणि अमानुष वागणूक सहन करत आहेत. याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स येथे वाचा.
अडियाला तुरुंगात दीर्घकाळ एकांतवासात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, त्यांनी उजव्या डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गमावली आहे, असे वृत्त आहे.
26
इम्रान खान यांना तुरुंगात दिली जातेय अमानुष वागणूक!
तुरुंगवास भोगत असलेले पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची 85% दृष्टी गेली असून, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, असे सुप्रीम कोर्टाच्या एका वकिलाने सांगितले आहे. तुरुंगात इम्रान यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात आहे. आवश्यक वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जात नाहीत. कुटुंबीयांना भेटूही दिले जात नाही, असे आरोप होत होते. आता सुप्रीम कोर्टाचे वकील सलमान सफदर यांच्या अहवालातून हे उघड झाले आहे.
36
आता इम्रान खान यांची ८५ टक्के दृष्टी गेली आहे
3-4 महिन्यांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी सामान्य 6x6 होती. नंतर दृष्टी अंधुक होऊ लागली. हे सांगूनही तुरुंग अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी उजव्या डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गमावली. आता त्यांची 85% दृष्टी गेली आहे, असे त्यांनी सांगितले.
46
वकील सलमान सफदर यांच्या अहवालातून अनेक गोष्टी उघड
पाकिस्तानच्या लष्कराच्या कडक निगराणीखाली असलेल्या इम्रान खान यांच्यासोबत हेतुपुरस्सर अमानुष आणि बेकायदेशीर वर्तन केले जात आहे, असे न्यायालयाने नियुक्त केलेले वकील सलमान सफदर यांच्या अहवालात उघड झाले आहे.
56
2023 पासून तुरुंगात एकांतवासात आहेत इम्रान खान
ऑक्टोबर 2023 मध्ये अडियाला तुरुंगात हलवल्यापासून, इम्रान खान यांना जवळपास दोन वर्षे चार महिने एकांतवासात ठेवण्यात आले आहे. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे, असे म्हटले जात आहे.
66
पाकिस्तानला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधाराची दुर्दशा
1992 मध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने इंग्लंडला हरवून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पाकचे पंतप्रधान म्हणूनही लक्ष वेधून घेणाऱ्या इम्रान खान यांना वयाच्या 73 व्या वर्षी अशा छळाला सामोरे जावे लागणे हे खरोखरच एक दुर्दैव आहे.