ऑस्ट्रेलियात हरियाणातील दोन भावांनी मिळून केली एका भारतीयाची हत्या, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणी कर्नाल येथील दोन भावांना ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये अटक करण्यात आली आहे.

Ankita Kothare | Published : May 9, 2024 6:35 AM IST

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणी कर्नाल येथील दोन भावांना ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली तो कर्नालचा रहिवासी आहे.तो सध्या मेलबर्नमध्ये M.Tech चे शिक्षण घेत होता. हत्या केलेल्या आरोपींचा शोध घेऊन गौलबर्नमध्ये अटक काण्यात आली. अभिजीत (वय 26) आणि रॉबिन गार्टन (वय 27) अशी आरोपींची नावे आहेत.

भाड्याच्या वादात हस्तक्षेप ठरला मृत्यूचे कारण :

कर्नालच्या गगसिना गावातील रहिवासी असलेल्या संधूची रविवारी रात्री छातीत वार करून हत्या करण्यात आली. संधूचे नातेवाईक यशवीर यांनी सांगितले की, संधूने काही भारतीय विद्यार्थ्यांमधील भाड्याच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

यशवीरने सांगितले की, नवजीतच्या मित्राने नवजीतकडे कार असल्याने त्याला त्याचे सामान घेण्यासाठी त्याच्या घरी जाण्यास सांगितले होते. त्याचा मित्र आत गेल्यावर नवजीतने आरडाओरडा ऐकला आणि बघितले की, हाणामारी सुरू आहे. नवजीतने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता भांडण करू नका, असे सांगून त्याच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले. नवजीतप्रमाणेच आरोपीही कर्नालचा रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले.

वडिलांनी शेती विकून पाठवले होते शिकायला :

यशवीरने सांगितले की, रविवारी सकाळी या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाली. नवजीतसोबत असलेला त्याचा मित्रही जखमी झाल्याचे त्याने सांगितले. यशवीरने सांगितले की, कुटुंबाला धक्का बसला आहे. नवजीत हा हुशार विद्यार्थी असून तो जुलै महिन्यात सुटी घालवण्यासाठी परत येणार होता. नवजीत दीड वर्षांपूर्वी स्टडी व्हिसावर ऑस्ट्रेलियाला गेला होता आणि त्याच्या शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी दीड एकर जमीन विकली होती. ते म्हणाले, "आम्ही भारत सरकारला विनंती करतो की, मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी आम्हाला मदत करावी."

आणखी वाचा :

जगातील सर्वाधिक करोडपतींच्या यादीत न्यूयॉर्क अव्वल ! या भारतीय शहराचाही यादीत समावेश

AstraZeneca कंपनीने जगभरातून परत मागवून घेतला कोविशिल्ड लसीचा साठा, नक्की कारण काय?

Share this article