Trump Iran : इराणला शस्त्रं दिली तर... चीनला ट्रम्प यांचा थेट इशारा, 50% टॅरिफ लावण्याची धमकी

Published : Apr 13, 2026, 08:43 AM IST
Trump Threatens China with 50 Percent Tariff

सार

Trump Threatens China with 50 Percent Tariff : चीनने इराणला शस्त्रपुरवठा करण्याचा प्रयत्न केल्यास, चिनी उत्पादनांवर ५०% अतिरिक्त कर लावू, असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

Trump Threatens China with 50 Percent Tariff : इस्लामाबादमधील शांतता चर्चा फिसकटल्यानंतर चीन इराणला शस्त्रपुरवठा करणार असल्याची गुप्तचर माहिती समोर आली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. 

चीनने इराणला शस्त्रं पाठवल्यास त्यांच्या उत्पादनांवर तब्बल ५०% टॅरिफ (कर) लावू, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. सध्या दोन आठवड्यांची तात्पुरती शस्त्रसंधी लागू असतानाच, चीन इराणला शस्त्रं पाठवण्याच्या तयारीत असल्याचं गुप्तचर अहवालात म्हटलं आहे. 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "चीन असं काही करेल असं मला वाटत नाही, पण तसं झाल्यास त्यांना ५०% टॅरिफला सामोरं जावं लागेल. ही एक मोठी रक्कम असेल," असा इशाराही त्यांनी दिला.

पुढच्या महिन्यात ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्याआधीच त्यांनी हा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा हवाला देत CNN ने सर्वात आधी हे वृत्त दिलं होतं. त्यानुसार, चीन इराणला नवीन हवाई संरक्षण प्रणाली (air defense systems) पाठवण्याच्या तयारीत आहे. गेल्या बुधवारी सुरू झालेल्या दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या शस्त्रसंधीदरम्यानच ही शस्त्रखरेदीची बातमी समोर आली आहे. चीनला धमकी देतानाच, ट्रम्प यांनी त्यांना क्रूड ऑईल विकण्याची तयारीही दर्शवली आहे. अमेरिकेसोबतच व्हेनेझुएलामधूनही तेल देण्याची ऑफर त्यांनी दिली. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर सध्या व्हेनेझुएलाचा कारभार अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहे. इस्लामाबादमधील शांतता चर्चा अयशस्वी झाल्याने या भागात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. त्यातच आता चीन इराणला शस्त्रं देणार असल्याच्या वृत्ताने तणाव आणखी वाढला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Iran Blockade : पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेने इराणचा मार्ग रोखला, जागतिक बाजारात खळबळ!
Cyclone Wayanu : ताशी 130 किमी वेगाने वारा, मुसळधार पाऊस, न्यूझीलंडमध्ये 'वायानु' चक्रीवादळाचे तांडव