मालदीवमध्ये मोइज्जू विजयाच्या अगदी जवळ, पक्षाने संसदेच्या निवडणुकीत जिंकल्या सर्वाधिक जागा, भारतासोबत संबंध बिघडणार?

Maldives Parliamentary Election : भारताचा तिरस्कार करणाऱ्या मालदीवमध्ये संसदेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

Chanda Mandavkar | Published : Apr 22, 2024 3:29 AM IST / Updated: Apr 22 2024, 09:03 AM IST

Maldives Election 2024 : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू (PresidentMohamed Muizzu) यांच्या पक्षाने रविवारी (21 एप्रिल) झालेल्या संसदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय देशातील नागरिकांनी चीनला पाठिंबा देणार असल्याचे दाखवून देत भारतासोबतचे संबंध बिघडू शकतात याचे संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. मालदीवच्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, मोइज्जू यांच्या पीपुल्स नॅशनल काँग्रेस (PNC) पक्षाने 86 जागांवैकी 66 जागांवर विजय मिळवला आहे. जो 93 सदस्यीस मजलिससाठी (संसद) बहुमताचा आकडा पार केला आहे.

भारतासोबतचे मालदीवचे नातेसंबंध बिघडणार?
मालदीवमध्ये मोइज्जू आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे सध्या संसदेत केवळ आठ जागा होत्या. गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मोठा विजय झाला पण बहुमत मिळाले नव्हते. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय झाल्याने मोइज्जू अतिशय खुश असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भारतासोबतचे मालदीवचे संबंध बिघडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला भारताला पाठिंबा देणाऱ्या मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी (MDP) यांच्याकडे बहुतम होते. पण त्यांना पराभवाच्या दिशेने जावे लागत आहे.

मोइज्जू यांचे जनतेला मतदानाचे आवाहन
45 वर्षीय मोइज्जू यांनी रविवारी सर्वप्रथम मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मोइज्जू यांनी एका शाळेच्या केंद्रात मतदान केले. याशिवाय मालदीवमधील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही मोइज्जू यांनी केले.

यामीन यांना आठवडाभराआधी मिळाला जामीन
आणखी एक चीन समर्थक नेता अब्दुल्ला यामीन यांना गेल्या आठवड्यात एका कोर्टाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 11 वर्षांची सुनावलेली शिक्षा रद्द केली. अशातचच यामीन यांना जामीन मिळाला.

आणखी वाचा : 

एलॉन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलला, समोर आले हे मोठे कारण

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार, 87 जणांचा मृत्यू तर अनेक गावे पाण्याखाली

Share this article