Mahatma Gandhi Statue Vandalize : लंडनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; भारताकडून तीव्र निषेध

Published : Sep 30, 2025, 09:32 AM ISTUpdated : Sep 30, 2025, 09:35 AM IST
Mahatma Gandhi Statue Vandalize

सार

Mahatma Gandhi Statue Vandalize : गांधी जयंतीच्या एक दिवस आधी लंडन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीयांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. भारत सरकारने याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Mahatma Gandhi Statue Vandalize : लंडन येथील टॅव्हीस्टॉक स्क्वेअरमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड (vandalism) केल्याबद्दल भारत सरकारने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचा वार्षिक समारंभ याच ठिकाणी होणार असताना, सोमवारी ही संतापजनक घटना उघडकीस आली.

ध्यानस्थ मुद्रेतील बापूंच्या या प्रतिष्ठित पुतळ्याच्या चौथऱ्यावर (plinth) आक्षेपार्ह ग्राफिटी रंगवलेली आढळून आली. भारतीय उच्चायुक्तांनी या घटनेचा अहवाल स्थानिक प्रशासनाकडे दिला असून, दूतावासाचे अधिकारी पुतळ्याच्या मूळ स्वरूपात पुनर्संचयनाचे (restoration) काम समन्वित करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत.

 

 

भारतीय उच्चायुक्तांनी समाज माध्यमांवर निवेदन जारी केले की, "लंडनच्या टॅव्हीस्टॉक स्क्वेअरमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना अत्यंत लाजिरवाणी आहे. आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो."

निवेदनात पुढे म्हटले आहे की, "हा केवळ तोडफोड नाही, तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या अवघ्या तीन दिवस आधी 'अहिंसेच्या विचारावर' केलेला हिंसक हल्ला आहे. आम्ही स्थानिक प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुतळ्याला पूर्ववत सन्मान मिळवून देण्यासाठी आमची टीम प्रशासनासोबत समन्वय साधत आहे."

अहिंसा दिनाचे कार्यक्रम

दरवर्षी, संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केलेल्या २ ऑक्टोबर रोजी, या स्मारकाजवळ पुष्पहार अर्पण करून आणि गांधीजींची आवडती भजने गाऊन गांधी जयंती साजरी केली जाते.

१९६८ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन जवळील या ठिकाणी हा कांस्य पुतळा बसवण्यात आला होता, कारण गांधीजींनी कायद्याचे शिक्षण याच परिसरात घेतले होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!