FIFA World Cup 2026 : लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, यंदाच्या फिफा वर्ल्डमध्ये पहिलीच हॅट्रिक करत मोडला विश्वविक्रम

Published : Jun 17, 2026, 09:57 AM IST
FIFA World Cup 2026

सार

FIFA World Cup 2026 : अर्जेंटीनाच्या संघाने अल्जेरियाच्या विरोधातील फिफा वर्ल्ड कपच्या सामन्यात दमदार खेळी केली आहे. या सामन्यावेळी सर्वाधिक गोल लिओनेल मेस्सीने करत इतिहास रचला आहे.

FIFA World Cup 2026 : लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) फिफा वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळी करत इतिहास रचला आहे. अल्जेरियाच्या विरोधात झालेल्या सामन्यात मेस्सीने वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिलीच हॅट्रिक केली आहे. या हॅट्रिकसह मेस्सीने सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आहे.

मेस्सीच्या हॅट्रिकचे कौतूक

अल्जेरियाच्या विरोधात झालेल्या फिफा वर्ल्डच्या कपच्या पहिल्या सामन्यात मेस्साने हॅट्रिक केला. सामन्याच्या 17 व्या मिनिटांपासून मेस्सीने दमदार खेळी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. सामन्याच्या पहिल्या भागात मेस्सीने एक गोल केला. त्यानंतर 60 व्या मिनिटाला मेस्सीने दुसरा गोल केला. ज्यावेळी मेस्सीने तिसरा गोल केला तेव्हा सामन्याच्या मैदानात मेस्सीच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

 

 

मेस्सीचा विश्वविक्रम

फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये मेस्सीची ही पहिलीच हॅट्रिक आहे. याशिवाय त्याच्या आंतरराष्ट्रीय करिरमधील ही 11 वी हॅट्रिक आहे. या हॅट्रिकसह मेस्सीने फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 16 गोल करण्याचा जर्मनीमधील मिरोस्लाव क्लोज (Miroslav Klose) याच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

6 वर्ल्डकप खेळणारा ठरला पहिलाच फुटबॉलर

फिफा वर्ल्ड कप 2026 च्या फुटबॉलच्या सामन्यामध्ये मेस्सीने अल्जेरियाच्या विरोधात केलेल्या या धमाकेदार खेळीमुळे त्याचे कौतूक होत आहे. याशिवाय मेस्सीच्या या इतिहासासह तो फिफा वर्ल्ड कप सहावेळा खेळणारा जगातील पहिलाच फुटबॉलर ठरला आहे.

फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलर

  • 16 गोल - मिरोस्लाव क्लोज (जर्मनी)
  • 16 गोल - लिओनेल मेस्सी (अर्जेंटीना)
  • 15 गोल - रोनाल्डो (ब्राझील)
  • 14 गोल - कायलियन एमबाप्पे लोटिन (फ्रान्स)
  • 14 गोल - गर्ड मुलर (Gerd Müller) (जर्मनी)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

चीन हादरले: ४० मिनिटांत भूकंपाचे ८ धक्के, बचावकार्याला झाली सुरुवात
Iran-US Deal : इराण-अमेरिकेमध्ये शांतता करारावर स्वाक्षरी, शुक्रवारपर्यंत उघडणार होर्मुझ