
Iran-US Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत आम्ही शांतता करारावर स्वाक्षरी केल्याचे जाहीर केले आहे. G7 समिटसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये उपस्थिती लावली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संवाद साधताना म्हटले की, होर्मुझची सामुद्रधुनी अंशत: खुली करण्यात आली असून येत्या शुक्रवारपणे पूर्णपणे सुरू होणार आहे.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, “आमच्यामध्ये उत्तम संवाद झाला. पण मध्येच अमेरिकेला दोन रात्र लष्करी कारवाई करावी लागली. पण आम्हाला याबद्दल खंत वाटते कारण आमचे इराणसोबत व्यवस्थितीत जुळून येत होते.”
दुसऱ्या बाजूला रॉयटर्सच्या मते, एका वरिष्ठ अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि इराणचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ (Mohammad Bagher Ghalibaf) यांच्याकडून शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या करारासंबंधित संपूर्ण माहिती पुढील 24-48 तासांमध्ये जाहीर केली जाणार आहे. याशिवाय आठवड्याच्या अखेरीस तांत्रिकीय स्तरावर कराराबद्दल संवाद सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
इराण-अमेरिकेमध्ये झालेल्या कराराचे संपूर्ण कागदपत्र जाहीर करण्यात आलेले नाहीत. इराणचे उप परराष्ट्रमंत्री काजेम गरीबाबादी यांनी म्हटले, अमेरिकेला तीन मोठी पावले उचलावी लागणार आहेत. यामध्ये नौदल नाकाबंदी पूर्णपणे संपवा. २. युद्ध आणि सर्व लष्करी कारवाया थांबवा. ३. इराणचा गोठवलेला निधी रिलीज करणे. यापुढे गरीबाबादी यांनी असेही म्हटले, सामंज्यस करारावर (MoU) स्वाक्षरी झाल्यानंतर 60 दिवसांमध्ये इराण-अमेरिकेमधील संवाद अशा गोष्टीवर अवलंबून आहे की अमेरिका तीन अटी पूर्ण करतो की नाही.
अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या शांतता करारावर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. नेतन्याहू यांनी म्हटले की, “माझी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे मत कधीच एकसमान नसते. याशिवाय करार होऊ दे किंवा नको, इराणकडे अण्वस्त्रे नसतील. याशिवाय इस्राइलचे सैन्य गाझा, लेबनॉन आणि सीरियामध्ये जोवर गरजेचे आहे तोवर असणार आहे.”