चीन हादरले: ४० मिनिटांत भूकंपाचे ८ धक्के, बचावकार्याला झाली सुरुवात

Published : Jun 16, 2026, 08:45 PM IST
China Earthquake

सार

चीनच्या किंघाई प्रांतात अवघ्या ४० मिनिटांत भूकंपाचे तब्बल ८ धक्के बसले, ज्याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल होती. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

चीनमधून सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या ४० मिनिटांमध्ये भूकंपाचे तब्बल ८ धक्के जाणवले आहेत. हा शक्तिशाली धक्का ६.३ रिस्टर स्केल एवढा आहे. भूकंपाचे प्रमुख केंद्र साधारण १० किमी खोल आहे. भूकंपाचे निर्देश मिळाल्यानंतर प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आला आहे.

कस झालं भूकंप? 

हा भूकंप किंघाई प्रांतात मंगळवारी स्थानिक वेळ 6.40 वाजता भूकंपाचे हे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र राजधानी शियांगपासून ५६७ किमी दूर आहे. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. सरकारने आता बचावकार्य सुरु केलं आहे.

बचावकार्य झालं सुरु 

या भूकंपाच्या धक्यांमध्ये जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार बचावकार्य करण्यासाठी दोन विशेष गाड्या तसेच 10 बचावकार्य करणाऱ्या जवानांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये किती नुकसान झालेले आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रशासन पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

चीनमध्ये कोणत्या प्रांतात भूकंप झाला? 

चीनमध्ये भूकंप झालेला भाग हा खूपच संवेदनशील मानला जात आहे. या भागात भूकंप होण्याचे प्रमाण जास्त आहे. पण यावेळी भूकंपाचे सलग आठ धक्के बसल्यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे. स्थानिक प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असून बचावकार्य करण्यात येणार आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

BMW Gift: थंडीत कुडकुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉसने दिली चक्क BMW कार!
Bone Marrow Cake: महिलेने बाळासाठी बनवला कलिंगड आणि बोन मॅरोचा केक!