जपान विमानसेवेवर सायबर हल्ल्या झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून तिकीटांची विक्रीही रद्द करण्यात आली आहे.
Japan Airlines Cyber Attack : जपान विमानसेवेलर गुरुवारी (26 डिसेंबर) सायबर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला आहे. याशिवाय विमानाच्या तिकीटांची विक्रीही रद्द करण्यात आली आहे.
सायबर हल्ला गुरुवारी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे विमानसेवेच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला गेला आहे. विमानसेवेचे प्रवक्ते यांनी सायबर हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले की, सध्या विमानांचे उड्डाण उशीरा किंवा रद्द होण्यासंदर्भात काहीच अपडेट नाही. सायबर हल्ल्यामुळे तिकीटांची विक्री थांबवण्यात आली असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, जपान एअरलाइन्स देशातील सर्वाधिक दुसरी मोठी एअरलाइन कंपनी आहे.
Tweet :
जपान टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, सायबर हल्ल्याच्या कारणास्तव विमानसेवेवर परिणाम झाला आहे. देशाअंतर्गत उड्डाणे उशीराने होण्याची शक्यता आहे. एअरलाइन्सने जारी केलेल्या विधानात म्हटले की, आम्हाला सायबर हल्ल्याबद्दल कळले आहे. आम्ही सिस्टिमच्या रिकव्हरीचे स्टेटस तपासून पाहत आहोत. अशातच देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीच्या तिकिटांची विक्री रद्द केली आहे. आम्हाला आमच्या असुविधेसाठी खेद आहे.
आणखी वाचा :