Marathi

Google layoffs: गुगलची १० टक्के कर्मचारी कपात: AI स्पर्धेचा परिणाम?

Marathi

गुगलने केली व्यवस्थापकीय पदांवर १० टक्के कपात

Business Insider च्यामते गुगलने व्यवस्थापन स्तरावर १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये डायरेक्टर व व्हाईस प्रेसिडेंट स्तरावरील कर्मचारीही समाविष्ट आहेत.

Image credits: Getty
Marathi

अधिक प्रभावी कामकाजासाठी पाऊल

कामकाज प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.  काही कर्मचाऱ्यांना ‘इंडिव्हिज्युअल कंट्रीब्यूटर’च्या भूमिकांमध्ये स्थानांतरित केले जाईल, तर काहींच्या भूमिका रद्द केल्या आहेत.

Image credits: social media
Marathi

कपातीचे कारण काय?

ही कपात AI क्षेत्रातील जलद प्रगती आणि OpenAI सारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे वाढलेल्या स्पर्धेमुळे करण्यात आली आहे. OpenAI च्या उत्पादनांना गुगल सर्चसाठी संभाव्य धोका मानले जात आहे.

Image credits: Getty
Marathi

गुगलने AI फीचर्सचा केला समावेश

OpenAI च्या स्पर्धेला उत्तर देण्यासाठी गुगलने आपल्या मुख्य व्यवसायात जनरेटिव्ह AI फीचर्स समाविष्ट केले आहेत. नवीन AI व्हिडिओ जनरेटर आणि जेमिनी मॉडेल्सचा नवीन सेट समाविष्ट केला आहे.

Image credits: social media
Marathi

गुगलची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न

गुगलने जानेवारी २०२३ मध्ये १२,००० हून अधिक कर्मचारी (जागतिक कर्मचारी संख्येच्या 6.4%) कमी केले होते. यामध्ये २०२४ च्या मे महिन्यात कोर टीममधील २०० कर्मचाऱ्यांची कपात समाविष्ट आहे.

Image credits: Getty
Marathi

कंपनीसाठी कठीण काळ- पिचई

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, “गेल्या 25 वर्षांत गुगलला असा क्षण अनुभवावा लागला नव्हता. मात्र जर आम्ही ही पावले उचलली नसती, तर परिस्थिती आणखी वाईट झाली असती.”

Image credits: social media
Marathi

‘गुगलीनेस’ची व्याख्या

मिटिंगमध्ये  पिचाई यांनी ‘गुगलीनेस’ या संकल्पनेची नव्याने व्याख्या केली. त्यांच्या मते, गुगलला अपडेट करण्यासाठी, मिशन-केंद्रित व संघभावनेने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज आहे.

Image credits: social media
Marathi

पुढील दिशा

गुगलचा हा निर्णय केवळ कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यापुरता मर्यादित नाही तर AI क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातो.

Image credits: Getty

हस्तांदोलन+शाबासकी!, कुवेतमध्ये PM मोदींनी कामगारांचा वाढवला उत्साह

D Gukesh: गुकेश आणि विश्वनाथन आनंद एकाच शाळेचे विदयार्थी

इस्रायलचे सीरियावर १०० हून अधिक मिसाईल हल्ले

जगातील धोकादायक देश आहे सीरिया! जाणुन घ्या १० खास गोष्टी