इस्राइलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तजाची हनेग्बी यांनी म्हटले की, “आमच्या युद्ध मंत्रीमंडळाने 2024 युद्धाचे वर्ष असल्याचे घोषित केले आहे. याशिवाय हमासचे सैन्य आणि शासकीय क्षमतांना नष्ट करण्यासाठी आम्हाला आणखी सात महिने युद्ध करावे लागू शकते.”
Israel Hamas Gaza War News : इस्राइल आणि हमासमध्ये गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. इस्राइलचे म्हणणे आहे की, आम्ही युद्ध आणखी सात महिने लढवू शकतो. इस्राइलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, गाझामध्ये युद्धाची स्थिती वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहू शकते. इस्राइलच्या युद्ध मंत्रिमंडळाने रफाहावर हल्ला करण्याचे ठरवलेच आहे. अशातच दहशतवादी समून हमासचा विनाश होईल.
इस्राइलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तबाजी हनेग्बी (Tzachi Hanegbi) यांनी म्हटले की, “आमच्या युद्ध मंत्रिमंडळाने 2024 ला युद्धाचे वर्ष घोषित केले आहे. हग्नेबी यांनी पुढे म्हटले की, मे 2024 युद्धाचा पाचवा महिना आहे. याचा अर्थ असा होतो की, हमासचे सैन्य आणि शासकीय क्षमता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणखी सात महिने युद्ध करावे लागू शकते.” दरम्यान, इस्राइलच्या अधिकाऱ्यांचे विधान अशावेळी आलेय जेव्हा मध्य राफामध्ये दिसून आलेले टँक बुधवारी (29 मे) गाझा शहराच्या दक्षिण दिशेला वळताना दिसून आले. इस्रावर जागतिक दबाव वाढत असला तरीही युद्धाची स्थिती कायम आहे.
हमास-इस्राइल नेत्यांच्या अटकेची मागणी
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्य वकीलांनी नुकत्याच इस्राइलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांच्यासह इस्राइल आणि हमासच्या नेत्यांच्या अटकेची मगणी केली आहे. वकील करीम खान यांनी म्हटले की, नेतन्याहू यांचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट आणि तीन हमासचे नेते युद्धासाठी जबाबदार आहे.
7 ऑक्टोंबरपासून युद्ध सुरू
7 ऑक्टोंबरला सकाळी हमासकडून जवळजवळ 5 हजार क्षेपणस्रे इस्राइलच्या शहरांवर डागण्यात आली. यानंतरच हमास आणि इस्राइलमध्ये युद्ध सुरू झाले आहे. इस्राइलने हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शपथ घेतलीय की, जोवर हमासला पूर्णपणे नष्ट ककत नाही तोवर युद्धाला पूर्णविराम देणार नाही.
गाझामधील वैद्यकिय अधिकाऱ्यांनुसार, इस्राइलच्या हल्ल्यामध्ये 35 हजारांहून अधिक पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 80 हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये बहुतांशजण महिला आणि मुलांचा समावेश आहे. 80 टक्के लोकसंख्या विस्कळीत झाली असून शेकडो हजारोजणांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
हल्ल्याची कारणे
हमासने म्हटले की, यरूशलममध्ये अल-अक्सा मस्जिदला इस्राइलने अपवित्र केल्याचा बदला घेतला जात आहे. हमासने म्हटले की, इस्राइलच्या पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मस्जिदीवर ग्रॅनेड हल्ला करत त्याला अपवित्र केले. इस्राइलच्या सैन्याकडून सातत्याने हमासच्या काही ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. इस्राइलच्या सैन्याकडून महिलांवरही हल्ले केले जात आहेत. हमासचे प्रवक्ते गाझी हमाद यांनी अरब देशांना आवाहन केलेय की, इस्राइलसोबतचे आपले संबंध मोडावेत.
आणखी वाचा :
इस्राइलने रफाह शहरात क्षेपणास्त्र हल्ला केला, या हल्यात 35 हून अधिक लोक ठार
25 दिवसानंतर...सर्वत्र क्षेपणास्र आणि गोळीबार होणार, 18 जूनसंदर्भात करण्यात आलीय ही मोठी भविष्यवाणी