Iran War : अमेरिका-इराण युद्ध संपले? डोनाल्ड ट्रम्प यांना तडजोडीच्या दाव्यावर मिळाले प्रतिउत्तर

Published : Jun 12, 2026, 07:53 AM IST
Iran War

सार

Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणसोबतचे युद्ध संपवण्याचा करार आठवड्याच्या अखेरपर्यंत होऊ शकतो. मात्र इराणकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले असून अद्याप कोणत्याही करारावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी असा दावा केली की, अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपले आहे. याशिवाय युद्धासंबंधित एक मोठा करार ठरवण्यात आला आहे. यावर आठवड्याच्या अखेरीस स्वाक्षरी होऊ शकते. ट्रम्प यांनी म्हटले की, इराण न्युक्लिअर बॉम्ब तयार करणार नाही यासाठी राजी झाला आहे. पण ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर काही तासांनी इराणकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.

इराणने ट्रम्प यांच्या दाव्याला खोडून लावत म्हटले की, कोणत्याही करारावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांना सांगितले, आम्ही इराणसोबतच युद्धविरामासाठी एक खास करार केला आहे. याशिवाय होर्मुज जलडमरूमध्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा तो पूर्णपणे खुला केला जाईल. उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स हे अमेरिकेडून या करारावर स्वाक्षरी करू शकतात असाही दावा ट्रम्प यांनी केला आहे.

इराणकडून दाव्याचे खंडण

ट्रम्प यांनी हा निर्णय अशावेळी घेतला जेव्हा कथित रुपात अमेरिकेकडून इराणवर हल्ला केला जाणार होता. पण इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगाई यांनी ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडण करत म्हटले की, संवादातून काही तोडगे निघाले आहेत. पण इराणने अद्याप कोणत्याही करारावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. याशिवाय तेहरान आपल्या रेड लाइन्ससंबंधितही कोणताही करार करणार नाही.

ट्रम्प यांचे विधान ठरले चर्चेचा विषय

ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर काही प्रश्न उपस्थितीत होत आहेत. एका बाजूला त्यांनी म्हटले की, आम्ही करार केला आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याच कराराला ट्रम्प यांनी अधिक मजबूत पण थोडा "काँसेप्च्युएल मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग" असे म्हटले. म्हणजेच करार पूर्णपणे ठरला आहे की, केवळ अद्याप सिद्धांतवर आधारित आहे यामध्ये स्पष्टता नाही.

एवढेच नव्हे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दावा केला की, कराराला क्षेत्रातील काही देशांनी समर्थन देखील केले आहे. इस्राइल, सौदी अरब, युएई, कतार, तुर्की, पाकिस्तान, बहरीन, कुवैत, जॉर्डन आणि इजिप्त अशा देशांची नावे घेतली पण इराणचे नाव ट्रम्प यांनी घेतले नाही. ही हैराण करणारी बाब आहे.

अनेक महिन्यांपासून ट्रम्प यांचे दावे

मार्च महिन्यापासूनच ट्रम्प यांनी काही दावे करण्यात सुरुवात केली. इराणसोबतचा करार अत्यंत जवळचा असल्याचे ट्रम्प यांनी वारंवार म्हटले. पण दोन्ही देशांमध्ये हल्ले अद्याप सुरू आहेत. एप्रिलमध्ये घोषित शस्त्रसंधीदेखील अनेक वेळा मोडण्याच्या उंबरठ्यावर आली होती. गुरुवारी ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांनी इराणवरील प्रस्तावित अमेरिकेचा एअर स्ट्राइक रोकण्यात आला आहे. कारण बाचतीत पुढे जात आहे. याशिवाय असेही स्पष्ट केले की, इराणवर दबाब ठेवण्यासाठी अमेरिका आपली पावले उचलत राहणार.

नक्की अडचण काय?

अमेरिकेची इच्छा आहे की इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखले जावे आणि त्याने आपल्या अणुकार्यक्रमावर कठोर मर्यादा स्वीकाराव्यात. दुसरीकडे, इराण आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवणे, परदेशात गोठवलेली अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता परत मिळवणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आपल्या भूमिकेला मान्यता मिळवणे यांसारख्या मागण्यांवर ठाम आहे. त्यामुळे, 'करार जवळपास झाला आहे' हा ट्रम्प यांचा दावा आणि 'अद्याप निर्णय झालेला नाही' हे इराणचे विधान, यांमध्ये तीव्र विरोधाभास आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलामध्ये 2 मोठे भूकंप, हजारो नागरिकांचा मृत्यू
Iran US Deal : कराराचे पालन न केल्यास कारवाई अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा