Iran War : मिडल ईस्टमध्ये तणाव वाढला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला थेट धमकी दिली आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. वाचा, इराण-अमेरिका संघर्षाचे ५ मोठे अपडेट्स...
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. युद्ध थांबवून करारावर येण्यासाठी तुमच्याकडे फक्त ३ दिवस म्हणजेच ७२ तास आहेत, असं ट्रम्प म्हणाले. जर इराणने ऐकले नाही, तर त्यांच्या तेल पाइपलाइनचा स्फोट होऊ शकतो, अशी धमकीही त्यांनी दिली. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, इराणवर निर्बंध असल्याने ते जहाजांमध्ये तेल भरू शकत नाहीत. त्यामुळे पाइपलाइनमध्ये तेलाचा दाब इतका वाढेल की ती आपोआप फुटेल. असं झाल्यास ती पुन्हा दुरुस्त करणं अशक्य होईल.
25
नक्की काय म्हणाले ट्रम्प?
फॉक्स न्यूजला दिलेल्या याच मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणला सल्ला दिला. ते म्हणाले, 'इराणने चर्चेसाठी इकडे-तिकडे धावण्याची गरज नाही, ते थेट मला फोन करू शकतात.' लवकरच हे युद्ध संपवू आणि यात अमेरिकेचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.
35
इराणची भूमिका
दुसरीकडे, इराणनेही आपली भूमिका कठोर केली आहे. दोन गोष्टींवर कोणतीही तडजोड होणार नाही, असं इराणने स्पष्ट केलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा अणुकार्यक्रम (न्यूक्लियर प्रोग्राम) आणि दुसरी म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी (समुद्राचा तो मार्ग जिथून जगातील सर्वाधिक तेलाची वाहतूक होते). या आपल्या 'रेड लाइन' आहेत आणि त्या ओलांडणे अशक्य आहे, असा संदेश इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला पाठवला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रविवारी संध्याकाळी २४ तासांत दुसऱ्यांदा पाकिस्तानात पोहोचले.
याच दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची मॉस्कोमध्येही पोहोचले आहेत. आज त्यांची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी भेट होणार आहे. रशियाने या प्रकरणात हस्तक्षेप करून काहीतरी मधला मार्ग काढावा, अशी इराणची इच्छा आहे. याआधी अराघची यांनी पाकिस्तान, ओमान आणि कतारसोबतही चर्चा केली आहे.
55
तेलाच्या किंमतीवर परिणाम
अमेरिका आणि इराणमधील चर्चा फिस्कटल्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर झाला आहे. ब्रेंट क्रूड (आंतरराष्ट्रीय मानक) प्रति बॅरल १०७ डॉलरच्या पुढे गेले आहे. तर, डब्ल्यूटीआय क्रूड (अमेरिकन मानक) ९६ डॉलरच्या वर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर येत्या काळात भारतासह जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगाने वाढू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.