आता फक्त मुलीच नाही, तर मुलेही सुरक्षित नाहीत. शेजारील पाकिस्तानमध्ये गोऱ्या रंगाच्या किशोरवयीन मुलांना जनावरांसारखं बाजारात विकलं जातंय. तिथे दर आठवड्याला असा बाजार भरतो आणि अनेक मुले विकली जातात.
जगात मुलांवर होणारे अत्याचार ऐकूनच अंगावर काटा येतो. पण पाकिस्तानमध्ये दर आठवड्याला चक्क मुलांचा बाजार भरतो. खैबर पख्तूनख्वा भागात 'छोकरा मंडी' नावाने हा बाजार चालतो. तिथे भाजीपाल्यासारखं गरीब घरातील मुलांना उभं करून त्यांचा लिलाव करतात. विशेषतः बन्नू, स्वाबी आणि डेरा इस्माईल खान या भागात शुक्रवार आणि रविवारी हा बाजार भरतो. श्रीमंत लोक तिथे येतात आणि स्वतःच्या विकृत छंदासाठी या किशोरवयीन मुलांना विकत घेतात.
23
बाचा बाजी प्रथा
या भयंकर प्रकारामागे 'बाचा बाजी' ही जुनी आणि वाईट प्रथा आहे. या प्रथेच्या नावाखाली मुलांकडून अश्लील डान्स करून घेतात आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. भयानक गरिबीमुळे काही आई-वडील मुलांना खायला देऊ शकत नाहीत, म्हणून ते त्यांना विकतात. तर काहींना दलाल खोट्या भूलथापा देऊन फसवतात. हयात प्रेघल या सामाजिक कार्यकर्त्याने नुकतंच सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट लिहून हे सत्य जगासमोर आणलं. त्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर टीका होतेय.
33
पाकिस्तानमधील कायदे
पाकिस्तानमध्ये मानवी तस्करी रोखण्यासाठी कायदे आहेत, पण ते फक्त कागदावरच उरलेत. गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्याचे नियम आहेत, पण पोलीस आणि प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. अधिकारी डोळेझाक करत असल्यामुळे हे दलाल कसलीही भीती न बाळगता हा काळाबाजार चालवतात. मोठ्या मंचांवरून बालहक्कांच्या गप्पा मारणारे नेते या मुलांचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवण्यासाठी कोणतीही पावलं उचलत नाहीत. कारण ते याला परंपरेचं नाव देऊन मोकळे होतात.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.