Beggars Salary : अमेरिकेत भीक मागणारे रोज किती कमवतात माहितीये? सॉफ्टवेअर इंजिनिअरपेक्षा जास्त?

Published : Oct 02, 2026, 11:57 AM IST

अमेरिका हा जगातला सर्वात प्रगत देश मानला जातो. तिथे सगळं कसं शिस्तीत आणि नियमांनुसार चालतं. पण अशा या अमेरिकेतही लोक भीक मागताना दिसतात का? आणि जर असतील, तर ते दिवसाला नक्की किती रुपये कमवत असतील?

PREV
15
अमेरिकेतील कॉर्पोरेट लाईफस्टाईल

अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंचच उंच इमारती, भारी लाईफस्टाईल आणि कॉर्पोरेट जॉब्स येतात. जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेत (USA) रस्त्यावर भीक मागणारे लोक असतील का, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण तिथेही चौकाचौकात, सबवे स्टेशनवर आणि ट्रॅफिक सिग्नलवर हजारो लोक मदत मागताना दिसतात. तिथल्या भाषेत त्यांना 'पॅनहँडलर्स' (Panhandlers) म्हणतात. मग हे लोक दिवसाला किती कमवतात? सोशल मीडियावर याबद्दल जे बोललं जातं, त्यात किती तथ्य आहे?

25
अमेरिकेतील भिकाऱ्यांची रोजची कमाई

अमेरिकेत भीक मागणारे लोक दिवसाला सरासरी २०० ते ५०० डॉलर्स (म्हणजेच भारतीय चलनात सुमारे १६,००० ते ४०,००० रुपये) कमवतात, असं काही लोक म्हणतात. पण तिथली खरी परिस्थिती वेगळीच आहे. तिथे एक सामान्य पॅनहँडलर दिवसाला सरासरी १५ ते ५० डॉलर्स (म्हणजेच १,२०० ते ४,००० रुपये) कमवतो. यातील बहुतांश लोक दिवसाचे ४ ते ८ तास रस्त्यावर उभे राहतात. या हिशोबाने त्यांना तासाला सरासरी ३ ते १० डॉलर्स मिळतात.

35
शहरांनुसार बदलते कमाई

न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस किंवा सिएटल यांसारख्या मोठ्या आणि गर्दीच्या शहरांमध्ये काही लोक दिवसाला ८० ते १०० डॉलर्स (सुमारे ८,००० ते १०,००० रुपये) कमवतात. पण सगळ्यांचीच कमाई एवढी नसते. ही रक्कम अमेरिकेतील काही राज्यांच्या किमान वेतनाइतकी (Minimum Wage) आहे.

अमेरिकेत काही 'प्रोफेशनल भिकारी' (Professional Beggars) सुद्धा असतात. अपंग असल्याचं नाटक करणं, सोबत पाळीव कुत्रे ठेवणं किंवा इमोशनल बोर्ड दाखवून ते लोकांचं लक्ष वेधून घेतात. काही रिपोर्ट्सनुसार, असे लोक वर्षाला ५०,००० डॉलर्सपेक्षा जास्त (सुमारे ४२ लाख रुपये) टॅक्स-फ्री इन्कम कमवतात आणि भारी आयुष्य जगतात.

45
भीक मागण्यामागची कारणं

अमेरिकेत भीक मागणारा प्रत्येक पॅनहँडलर आळशी असतो असं नाही. यामागे अनेक गंभीर सामाजिक आणि आर्थिक कारणं असतात. रिपोर्ट्सनुसार, पॅनहँडलिंग करणाऱ्यांपैकी ३० टक्क्यांहून अधिक लोक गंभीर मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. वैद्यकीय खर्चामुळे कर्जात बुडालेले आणि घर गमावलेले अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. याशिवाय, कायमस्वरूपी पत्ता (Permanent Address), ओळखपत्र आणि शिक्षण नसल्यामुळे त्यांना साध्या नोकऱ्याही मिळत नाहीत. काही लोक व्यसनांच्या (Drugs) आहारी जाऊन समाजापासून दुरावतात आणि या अवस्थेला पोहोचतात.

पॅनहँडलर्सचे प्रकार

अमेरिकेत भिकाऱ्यांचे दोन प्रकार आहेत. पहिले 'पॅसिव्ह पॅनहँडलिंग' (Passive) करणारे, जे शांतपणे "Homeless and Hungry, God Bless You" असा बोर्ड घेऊन बसतात. ते कोणाकडेही थेट पैसे मागत नाहीत. दुसरे 'अॅग्रेसिव्ह पॅनहँडलिंग' (Aggressive) करणारे, जे थेट लोकांकडे किंवा गाड्यांजवळ जाऊन पैसे मागतात. काही शहरांमध्ये या दुसऱ्या पद्धतीवर कायदेशीर बंदी आहे.

55
अमेरिकन सरकारची भूमिका

युट्युबर्स जे काही दाखवतात, ते सगळंच खरं नसतं. अमेरिकेतील महागाई आणि राहणीमानाचा खर्च पाहता, पॅनहँडलर्सची कमाई खूपच कमी असते. या पैशातून फक्त त्यांचं रोजचं जेवण आणि प्राथमिक गरजा भागत असतात. अमेरिकन सरकार आणि अनेक स्वयंसेवी संस्था (NGOs) या लोकांना मोफत जेवण आणि रात्री राहण्यासाठी निवारा देतात. तरीही, पॅनहँडलिंग हे तिथल्या समाजापुढील एक मोठं आव्हान बनून राहिलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories