Harvard Scientist Claims: शास्त्रज्ञाने सांगितली स्वर्गाची विश्वातील नेमकी जागा!

Published : Feb 28, 2026, 12:55 PM IST
Harvard Scientist Claims:

सार

Harvard Scientist Claims: हार्वर्डचे शास्त्रज्ञ मायकल गिलेन यांच्या मते, स्वर्ग हे एक भौतिक ठिकाण असून ते 'कॉस्मिक हॉरिझॉन'च्या पलीकडे आहे. आईनस्टाईन आणि हबलच्या नियमांचा आधार घेत त्यांनी हा दावा केलाय, पण इतर शास्त्रज्ञांनी तो फेटाळून लावला आहे.

Harvard Scientist Claims: स्वर्ग हे विविध धर्मांनुसार मृत्यूनंतर मिळणारेदेव-देवता आणि पुण्यात्म्यांचे निवासस्थान मानले जाते जिथे अनंत सुख आणि प्रकाश आहे. हिंदू धर्मात याला 'स्वर्गलोक' म्हणतात, जी इंद्रदेवाची राजधानी मानली जाते. हे स्थान सत्कर्म आणि पुण्याईचे फळ म्हणून ओळखले जाते. इथे दुःख नाही म्हणूनही दावा केला जातो. अनेकदा स्वर्ग ही कल्पना केवळ आकाशात नसून जिवंतपणी सत्कर्मांनी निर्माण होणारी मनाची आनंदी अवस्था म्हणजेही स्वर्ग आहेअसे म्हटले जाते.

'इथेच स्वर्ग, इथेच नरक' असंही आपण नेहमीच ऐकतो. पण मृत्यूनंतर खरंच स्वर्ग-नरक असतं का, हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. पण आता एका शास्त्रज्ञाने केलेल्या दाव्यामुळे संपूर्ण जगात एक नवी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मते, स्वर्ग खरंच अस्तित्वात आहे आणि ते आपल्याच विश्वाचा एक भाग आहे.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे भौतिकशास्त्राचे लेक्चरर आणि सायन्स कम्युनिकेटर मायकल गिलेन यांनी एका संशोधनानंतर हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण ज्याला स्वर्ग म्हणतो, ते ठिकाण 'कॉस्मिक हॉरिझॉन'च्या (Cosmic Horizon) पलीकडे आहे.

स्वर्ग खरंच अस्तित्वात आहे

आपला दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही वैज्ञानिक कारणंही दिली आहेत. एडविन हबल यांच्या नियमानुसार, कोणतीही आकाशगंगा (galaxy) पृथ्वीपासून जितकी दूर असते, तितक्याच वेगाने ती आपल्यापासून दूर जाते. गिलेन म्हणतात की, याच हिशोबाने विचार केल्यास, स्वर्ग 'कॉस्मिक हॉरिझॉन'च्या दुसऱ्या बाजूला असू शकतो. त्यांच्या दाव्यानुसार, हे अंतर पृथ्वीपासून तब्बल 439 अब्ज ट्रिलियन किलोमीटर दूर आहे.

काय आहे 'कॉस्मिक हॉरिझॉन'?

गिलेन यांच्या मते, 'कॉस्मिक हॉरिझॉन' म्हणजे आपल्या विश्वाची ती सीमा, ज्याच्या पलीकडे आपण पाहू शकत नाही. त्यांच्या मते, ही सीमा जिथे संपते, तिथूनच स्वर्गाची सुरुवात होते. यामागे त्यांनी चार कारणं दिली आहेत. आधुनिक विश्वरचनाशास्त्रानुसार, 'कॉस्मिक हॉरिझॉन'च्या पलीकडेही विश्व अस्तित्वात आहे, पण ते आपल्यापासून कायमचं लपलेलं आहे, कारण आपण त्या सीमेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही.

आईनस्टाईनच्या सिद्धांताचा आधार

गिलेन यांनी आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताचाही (Theory of Relativity) आधार घेतला आहे. आईनस्टाईनच्या मते, 'कॉस्मिक हॉरिझॉन'वर पोहोचल्यावर काळ थांबतो. याचा अर्थ, त्या बिंदूपलीकडे भूतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ असं काहीच नसतं. गिलेन यांच्या मते, स्वर्ग अशाच ठिकाणी असू शकतो जिथे काळ अस्तित्वात नाही. तसेच, 'कॉस्मिक हॉरिझॉन'वर आपल्या विश्वातील सर्वात जुन्या खगोलीय वस्तू आहेत, असंही ते म्हणतात.

इतर शास्त्रज्ञांचा विरोध

मात्र, अनेक शास्त्रज्ञांनी गिलेन यांचा हा सिद्धांत फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते, हा विज्ञानाचा नाही, तर तत्त्वज्ञानाचा विषय आहे. कनेक्टिकट कॉलेजमधील खगोलशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ॲलेक्स जियानिनास यांनी या दाव्याला विरोध केला आहे. 'पॉप्युलर मॅकेनिक्स'ला दिलेल्या माहितीत ते म्हणाले, "'कॉस्मिक हॉरिझॉन' हे कोणतंही भौतिक ठिकाण नाही, तर ती एक अशी सीमा आहे ज्याच्या पलीकडे आपण पाहू किंवा संवाद साधू शकत नाही."

त्यांच्या मते, आपलं विश्व सुमारे 13.8 अब्ज वर्ष जुनं आहे आणि प्रकाश सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर वेगाने प्रवास करतो. त्यामुळे, ज्या ठिकाणाहून निघालेला प्रकाश आतापर्यंत पृथ्वीवर पोहोचला आहे, तेवढाच भाग आपण पाहू शकतो. काही ठिकाणं इतकी दूर आहेत की तिथला प्रकाश आपल्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की तिथे विश्व संपतं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Bolivia Plane Crash : नोटा घेऊन जाणारं लष्करी विमान रस्त्यावर कोसळलं, १५ ठार!
Pakistan Afghanistan Conflict : युद्ध पेटलं? 300+ ठार, 500 जखमी; ट्रम्प म्हणाले...