Elon Musk Instagram: 'इन्स्टाग्राम फक्त मुलींसाठी आहे', एलॉन मस्कच्या वक्तव्यावर सोशल मीडियात जुंपली!

vivek panmand   | CMS
Published : Oct 02, 2026, 08:40 PM IST
instagram

सार

इन्स्टाग्राम हे फक्त मुलींसाठीच असलेलं ॲप आहे, असं वक्तव्य एलॉन मस्क यांनी केलंय. यापूर्वीही त्यांनी अशीच कमेंट केली होती. आता त्यांच्या या नव्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलंय.

बंगळुरू: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'चे (पूर्वीचे ट्विटर) मालक एलॉन मस्क यांनी इन्स्टाग्रामबद्दल (Instagram) केलेल्या एका वक्तव्यामुळे इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. इन्स्टाग्राम हे फक्त मुलींसाठीच असलेलं प्लॅटफॉर्म आहे, असं मस्क म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'गायगर कॅपिटल' (Geiger Capital) नावाच्या एका एक्स युझरने इन्स्टाग्राम डिलीट केल्याची पोस्ट शेअर केली होती. "मी अधिकृतपणे इन्स्टाग्राम डिलीट केलंय. ते मुळात महिलांसाठी असलेलं ॲप आहे. त्याचा काहीही उपयोग नाही," असं या युझरने लिहिलं होतं. या पोस्टवर लगेच रिप्लाय देत एलॉन मस्क यांनी "इन्स्टाग्राम फक्त मुलींसाठी आहे" (Instagram is for girls) अशी कमेंट केली.

मे महिन्यातही मस्क यांनी केली होती अशीच कमेंट!

एलॉन मस्क यांनी इन्स्टाग्रामची खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे महिन्यातही सोशल मीडियाच्या सवयी आणि ऑनलाइन ट्रेंड्सबद्दल सुरू असलेल्या एका व्हायरल चर्चेत मस्क यांनी असंच वक्तव्य केलं होतं.

लोकांचं ऑनलाइन वागणं त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे कसे दाखवतं, यावर ती चर्चा होती. यात दिवसभर इन्स्टाग्रामवर 'स्टोरीज' टाकणं, स्वतः बनवलेल्या जेवणाचे फोटो शेअर करणं आणि आकर्षक फोटो (Thirst Traps) पोस्ट करण्याच्या सवयींचा उल्लेख होता. त्यावेळी रिप्लाय देताना मस्क यांनी "इन्स्टाग्राम फक्त मुलींसाठी आहे" असं लिहिलं होतं. एवढंच नाही तर, स्वतःची इन्स्टाग्राम प्रोफाईल शेअर करणाऱ्या प्रौढ पुरुषांना पाहून "हे लोक लिंगबदल (Transitioning) करत आहेत की आणखी काही, हेच कळत नाही," अशी खिल्लीही त्यांनी उडवली होती. मस्क यांच्या या कमेंटवरून त्यावेळी मोठा वाद झाला होता आणि हे वक्तव्य लिंगभेद करणारं (Sexist) असल्याचं म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

मस्क यांची ही ताजी कमेंट आता पुन्हा व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मस्क यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एका युझरने थेट विचारलंय, "मग तुमचं 'एक्स' प्लॅटफॉर्म कोणासाठी आहे?" दुसऱ्या एका युझरने "एक्स ॲप कोणाच्या मालकीचं आहे?" असा टोला लगावलाय. तर काहींनी मस्क यांचं मत पूर्णपणे फेटाळून लावलंय. "मला हे अजिबात मान्य नाही. इन्स्टाग्राम हे सर्व लिंगाच्या लोकांसाठी खुलं असलेलं एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे," असं एकाने लिहिलंय. तर दुसऱ्याने "इन्स्टाग्राम हे प्रत्येकासाठी असलेलं ॲप आहे," असं सडेतोड उत्तर दिलंय.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vietnam Travel Guide : आपले 100 रुपये इथे होतात 30000; भारतीयांसाठी सर्वात स्वस्त देश कोणता?
Israel Elections : इस्रायलमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप, नेतन्याहू आणि लष्करप्रमुखांमध्ये खडाजंगी